टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध मालिकांपैकी एक असलेल्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ने कोट्यवधी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. ही मालिका २८ जुलै, २००८ला सुरू झाली होती. फार कमी वेळात हा कार्यक्रम घराघरात पोहोचला. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. अगदी बालकांपासून ते वृद्धांपर्यंत हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. सोशल मीडियावरही या पात्राची खूप चर्चा आहे. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मधील बबीता या पात्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते.
ती आपल्या हटके आणि आकर्षक अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. चाहत्यांना तिचा हा अंदाज खूपच आवडतो. नुकतेच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपले फोटो शेअर केलेे आहेत, जी खूपच व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये मुनमुन दत्ताने ऍनिमल प्रिंटेड ड्रेस घातला असून ती त्यात खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत कौतुक केले आहे. एकाने लक्षवेधी कमेंट करत ‘ऑल टाईम फेव्हरेट,’ असे लिहिले. दुसरीकडे काही युजर्स तिची खिल्ली उडवत आहेत.
या फोटोशूटमध्ये मुनमुनने खूप आकर्षक पोज दिली आहेत. त्याचबरोबर तिच्या ड्रेस आणि स्टाईलिंगबरोबरच ती खूप सुंदर दिसत आहे.
चाहत्यांना तिचा वेगळा लूक आवडला असून, तिचे फोटो खूप पसंत केले जात आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-वाथी कमिंग! भन्नाट डान्स करत अभिनेता संदिप पाठकने समाजाला दिला मोलाचा सल्ला