Wednesday, July 3, 2024

उदित नारायण यांना पाहून कृष्णा अभिषेकला आली मामा गोविंदाची आठवण; सर्वांसमोर म्हणाला…

‘द कपिल शर्मा शो’ टीव्ही विश्वातील सर्वात प्रसिद्ध शो आहे. हा शो गेली सहा महिने बंद होता. मात्र, आता हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सक्रिय झाला आहे. यासोबतच कलाकारची शोमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शोच्या पहिल्या पर्वापासून होस्ट कपिल शर्माने त्याच्या काॅमेडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता या शोच्या नव्या पर्वामध्ये प्रसिद्ध गायक उदित नारायण, कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल हे विशेष पाहूणे म्हणून उपस्थित झाले. त्यांनी त्यांच्यासोबत ९०च्या दशकातील आठवणींना उजाळा दिला.

‘द कपिल शर्मा शो’च्या अलिकडेच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये गाणी, जुने किस्से आणि रंजक डान्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. एपिसोडच्या सुरुवातीला कुमार सानूंच्या ‘धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना’ या गाण्यावर होस्ट कपिल शर्मा डान्स करताना दिसला. तसेच सर्व गायकांनी ‘चांद सितारे’, ‘मैं निकला गड्डी लेके’, आणि ‘तम्मा तम्मा’ यांसारख्यी हिट गाणी सादर केली. अनुराधा पौडवाल यांनी आणि उदित नारायण यांच्यासोबत माधुरी दीक्षितचे प्रसिद्ध गाणे ‘धक धक’ देखील गायले.

त्यावेळी त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील काही रंजक किस्सेही शेअर केले. कपिलने सानू यांना प्रश्न विचारला की, तुमचे केदारनाथ भट्टाचार्य हे नाव का बदलले? यावेळी उत्तर देताना सानू म्हणाले की, “कल्याणजी आणि आनंदजी या प्रसिद्ध गायकांच्या जोडीमधील कल्याणजींनी त्यांना हे नाव दिले. कारण ते बंगली भाषेत बोलले होते. कल्याणजी त्यांना एक अस्पष्ट नाव देऊ इच्छित होते. जेणेकरुन त्यांना इंडस्ट्रीमध्ये टाइपकास्ट केले जाऊ नये.

https://www.instagram.com/p/CUAQ3fKquqb/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, उदित गमतीच्या अंदाजात अनुराधा यांना म्हणतात की, “तुमच्या लग्नाआधीच मी तुम्हाला भेटलो असतो तर?” यावर बोलताना अनुराधा म्हणाल्या की, “तेव्हा कदाचित माझे नाव अलका असते.” यावर कपिल म्हणतो की, “उदित यांनी ५ मिनिटांमध्ये अनुराधा यांच्या हाताला १० वेळातरी स्पर्श केला असेल.” उदित म्हणतात की, “याज्ञिक आणि पौडवाल यांच्यासोबत रोमान्स करताना, त्यांच्या गाण्यावरही रोमान्स करणे गरजेचे आहे.” दरम्यान, शोमधे कृष्णाही पाहुण्यांसमोर आला आणि त्याच्या स्टाईलने सर्वाना खळखळून हसवू लागला. यावेळी कृष्णा अभिषेक उदित यांना म्हणाला की, “तुम्हाला पाहून मला माझ्या मामाची आठवण झाली.” हे ऐकून होस्ट आणि अर्चना पूरन यांना हसू अनावर झाले.

गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद कोणापासून लपून नाहीये. अलीकडेच, जेव्हा गोविंदा शोमध्ये आला होता, तेव्हा कृष्णा अभिषेकने एपिसोड शूट करण्यास नकार दिला. दुसरीकडे, गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला कधीच कृष्णा अभिषेकचा चेहरा बघायचा नाही.

 

 

हे देखील वाचा