Wednesday, June 26, 2024

‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक

टेलिव्हिजनचा प्रसिद्ध रिऍलिटी शो ‘बिग बॉस’ हा प्रेक्षकांना खूप आवडतो. या शोमध्ये दररोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. काही स्पर्धकांची मैत्री होते, तर काहींमध्ये भांडणं सुरू होतात. स्पर्धकांमधील भांडणं या शोचा मसाला असतो. तर काही जणांची मैत्री ही इतकी घट्ट होते की, हा शो संपल्यानंतरही ते एकत्र दिसतात. तर काही एकमेकांचे तोंड पण बघत नाहीत. हे सर्व प्रेक्षकांना पाहायला खूप आवडते. या शोचा प्रेक्षकांवर इतका खोल प्रभाव आहे की, शो संपल्यानंतरही ते स्पर्धकांना फॉलो करत असतात. या शोचे स्पर्धक अनेकदा त्यांचे फोटो आणि लाइफ अपडेट  चाहत्यांसोबत शेअर करतात. मात्र, या शोशी संबंधित काही सेलिब्रिटी असे आहेत, जे आता या जगात नाहीत. आज या लेखातून बिग बॉसच्या त्या स्पर्धकांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी या जगाला निरोप दिला आहे.

सिद्धार्थ शुक्ला
सिद्धार्थ शुक्ला हा ‘बिग बॉस १३’व्या सीझनचा विजेता आहे. सिद्धार्थ या शो मध्ये खूप गाजला होता. मग ती त्याची टास्क खेळायची पद्धत असो किंवा त्याची घरातील भांडणं असो. तो प्रेक्षकांना खूप आवडायचा. इतकेच नव्हे, तर त्याची आणि शहनाझ गिलची मैत्री देखील प्रेक्षकांना खूप आवडायची. परंतु, दुर्दैवाने सिद्धार्थ शुक्लाचे याच महिन्यात निधन झाले. सिद्धार्थने २ सप्टेंबर २०२१ रोजी त्याच्या ओशिवारा फ्लॅटमध्ये अखेरचा श्वास घेतला. वय वर्ष ४० असताना सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

प्रत्युषा बॅनर्जी
टीव्ही मालिका ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचे २०१६ मध्ये निधन झाले. प्रत्युषाने गळफास लावून आत्महत्या केली होती. प्रत्युषा देखील ‘बिग बॉस’ ची स्पर्धक होती. त्याचबरोबर सिद्धार्थ शुक्ला आणि प्रत्युषा बॅनर्जी हे खूप जवळचे मित्र होते.

स्वामी ओम
स्वामी ओम हे ‘बिग बॉस १०’ चे स्पर्धक होते. स्वामी ओम यांनी या शोद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मात्र, बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय स्पर्धक आता या जगात नाहीत. खरं तर, ते अनेक दिवसांपासून आजारी होते आणि नंतर अर्धांगवायूमुळे त्यांचे निधन झाले.

जेड गुडी
हॉलिवूड रिऍलिटी शो ‘बिग ब्रदर’ मध्ये दिसणारी जेड गुडी भारतीय रिऍलिटी शो ‘बिग बॉस’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. जेड गुडीला कर्करोगाने जकडले होते. त्यामुळे २००९ मध्ये या आजाराशी झुंज देताना निधन झाले.

जयश्री रमय्या
‘बिग बॉस’च्या कन्नड आवृत्तीचा भाग असलेल्या जयश्रीचाही याच वर्षी मृत्यू झाला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, जयश्री बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनने त्रस्त होती. त्यानंतर तिच्या संशयास्पद मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली.

सोमदास चित्तनूर

‘बिग बॉस मल्याळम’ या शोमध्ये सहभागी झालेले सोमदास चित्तानूर यांचा देखील मृत्यू झाला. सोमदासला कोरोनाची लागण झाली होती. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण

-पहिलीपासून लपून दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी ‘दबंग खान’ने चक्क बदलले होते स्वतःचे दात; मजेदार आहे तो किस्सा

-काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा

हे देखील वाचा