Saturday, April 19, 2025
Home टेलिव्हिजन उर्फीच्या नव्या लूकची युजर्सनी उडवली थट्टा; म्हणाले, ‘ही आहे कुल्फी जावेद…’

उर्फीच्या नव्या लूकची युजर्सनी उडवली थट्टा; म्हणाले, ‘ही आहे कुल्फी जावेद…’

काही कलाकार असे असतात, जे रुपेरी पडद्यावर न झळकताच माेठ्या प्रमाणात चर्चेत असतात. या कलाकारांमध्ये उर्फी जावेद हे नाव घेतले जाणार नाही, असे होणार नाही. उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे सर्वांचे लक्ष वेधते. अशातच उर्फी मुंबईतील एका हॉटेलबाहेर स्पॉट झाली, ज्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल हाेत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये उर्फीने शंकूच्या आकाराचे ब्रॅलेट परिधान केले आहे. ज्याने युजर्सचे लक्ष वेधले असून ते भिन्नभिन्न कमेंट करत आहेत.

इंस्टाग्रामवर व्हायरल हाेत असलेल्या व्हिडिओमध्ये उर्फी (uorfi javed) हिने ब्रॅलेट परिधान केले असून लाॅंग स्कर्ट घातला आहे. यासाेबत तिने स्माेकी मेकअप केले असून तिचे केस बांधेल आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मात्र, उर्फी जावेदचा हा ड्रेस काही युजर्सला आवडला नाही आणि त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल केले. एकाने ‘कुल्फी जावेद सॉरी उर्फी’ असे लिहिले आहे. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘ओह हे काय लावून आली आहे आयस्क्रिमचा काेन? तू विनोद पाहत आहेस ना?, एका युजने चक्क कमेंट करत लिहिले की,’निर्लज्जपणाची मर्यादा असते.’

विशेष म्हणजे उर्फी जावेद तिच्या अतरंगी स्टाईलमुळे खूप चर्चेत असते. अलीकडेच तिच्यावर एका राजकारण्याने तक्रार दाखल केली हाेती, ज्यामुळे तिला पोलीस ठाण्यातही जावे लागले हाेते. मात्र, या गोष्टींना मागे टाकून उर्फी पुढे आली आहे आणि आता पुन्हा एकदा ती नव्या अंदाजात दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेद सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय असून तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहतेही तिच्या नवीन लूकचे खूप आतूरतेने वाट पाहात असतात. एवढेच नाहीतर उर्फीचा लूक अनेक कालाकारांनाही आवडताे. उर्फी अखेरची बिग बॉस ओटीटीमध्येही दिसली हाेती. याव्यितिरिक्त तिने अनेक कलाकारांसाेबत काम केले आहे.(tv uorfi javed cone look bralette gone viral fans claims this is kulfi javed style see video)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रणबीर कपूरने रागाने फेकला चाहत्याचा मोबाईल? पाहा नेटकर्यांनी कसा घेतला अभिनेत्याचा समाचार

दु:खद! एनटीआर आणि नागेश्वर राव सारख्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

हे देखील वाचा