अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिंदी चित्रपट जगतातील क्युट कपल म्हणून ओळखले जातात. अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. विविध विषयांवर ती आपले स्पष्ट आणि परखड मत व्यक्त करत असते. या तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा तिला नेटकऱ्यांच्या रोशालाही सामोरे जावे लागले आहे. आता अलिकडेच तिने ‘काश्मिर फाइल्स’ चित्रपटाबद्दल काही मजेशीर गोष्टी लिहिल्या आहेत. सध्या काश्मिर फाइल्स चित्रपटावरुन तिने सगळे दिग्दर्शक त्यांच्या आगामी चित्रपटांची नावे तशीच निवडत असल्याचे तिने लिहले आहे त्याचप्रमाणे तिने तिच्या जीवनावर चित्रपट आला तर काय नाव असेल हे सुद्धा सांगितले आहे.
याबाबत संपुर्ण माहिती अशी की, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाइल्स चित्रपट सध्या देशभर गाजत आहे. अनुपम खेर आणि पल्लवी जोशी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट प्रचंंड लोकप्रिय ठरला आहे. चित्रपटाने कमाईचे नवनवे रेकॉर्ड तयार करत सगळ्यांनाच विचार करायला लावले आहे. या चित्रपटाच्या यशामुळे सध्या चित्रपट जगतात अशाच नावाचे चित्रपट तयार करण्याची चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल ट्विंकल खन्नाने मत व्यक्त केले आहे.
यामध्ये ती म्हणते की, “नुकतीच मी दिग्दर्शकाला भेटल्यानंतर मला समजले की या चित्रपटाच्या यशानंतर अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांची अशीच नावे ठेवली आहेत. मोठमोठ्या शहरांची नावे यासाठी निवडण्यात आली आहेत त्यामध्ये अंधेरी फाइल्स,खारगर फाइल्स अशी नावे निवडण्यात आली आहेत. यामुळे मी माझ्या चित्रपटाचे नाव नेल फाइल्स असे ठेवणार आहे. याबद्दल मी आईला विचारले असता त्यामध्ये तु तुझ्या खराब नेल्सबद्दल सांगणार आहेस का असे विचारल्याचे” तिने सांगितले. दरम्यान ‘काश्मिर फाइल्स’ चित्रपटात १९९० मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांवरील अन्याय अत्याचाराचे वास्तव दाखवले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा