Saturday, July 6, 2024

किती भारी ना! ट्विंकल खन्नाने केला पती अक्षय कुमारसोबतचा सुंदर फोटो शेअर; जोडीवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

अनेक विनोदी तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटात काम करून अभिनेता अक्षय कुमार हा आता सगळ्यांचा आवडता बनला आहे. तो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असून त्याच्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा तो सोशल मीडियावर करत असतो. अशातच त्याची पत्नी ट्विंकल खन्नासोबत त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अक्षयसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ते दोघे एकमेकांशी बोलण्यात मग्न झालेले आहेत. त्यांचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. चाहते सातत्याने या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या या फोटोला आतापर्यंत २ लाख ९३ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच त्यांच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट देखील केली आहे. (Twinkle Khanna and Akshya kumar’s beautiful pictures goes viral fans are giving such a reaction)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आम्ही जेव्हा गप्पा मारत होतो, तेव्हा भाचीने हे फोटो काढले. मला असे वाटते की, या गप्पा लग्नाच्या वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. तुम्ही तुमच्या सुंदर स्माईलसोबत सुरुवात करता. शेवटच्या फोटोत मी त्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबत मी माझ्या कॉफीकडे देखील लक्ष देत आहे. ‘जब वी मेट’पासून ते ‘व्हॉट द हेक’पर्यंत.”

तिने शेअर केलेले हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या या फोटोवर अभिनेत्री टिस्का चोप्रा हिने कमेंट केली आहे की, “लग्नात काही असो किंवा नसो, पण तुम्ही दोघे खाताना खूप छान दिसता. पॅलेट क्लिंझरशिवाय एकामागून एक.” तसेच महेश भूपती यांनी हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच हुमा कुरैशी हिने देखील या फोटोवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय सध्या शूटिंगसाठी परदेशात आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्रुती मराठेच्या डॅशिंग लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष; कुणाला आवडला ड्रेस, तर कुणाला तिचा लूक

-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

-‘माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यासाठी…’, म्हणत भरत जाधवने दिल्या महेश कोठारेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे देखील वाचा