Wednesday, July 3, 2024

रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर ट्विंकल खन्नाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मी झूम करुन करुन बघितलं पण…’

हिंदी सिने जगतात अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड  फोटोशूटने चांगलीच खळबळ माजवली आहे. रणवीरच्या या फोटोशूटनंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रणवीर सिंग आजही त्याच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आहे.  त्याने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते, ज्यामुळे बराच गोंधळ झाला होता. एकीकडे रणवीरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले तर दुसरीकडे अभिनेत्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला. मात्र, बॉलिवूड कलाकारांनी याप्रकरणी रणवीरला उघडपणे पाठिंबा दिला असून आता ट्विंकल खन्नानेही (Twinkle Khanna) रणवीर सिंगच्या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने एक ब्लॉग लिहिला आहे, ज्यामध्ये तिने रणवीरच्या बोल्ड फोटोशूटवर आपले मत मांडले आहे. तिने हा ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते की, “ठाणे येथे १८९१ मध्ये कथितपणे असलेल्या जगातील पहिल्या न्युडिस्ट कॉलनीपासून ते आमचे न्युडिस्ट रणवीर सिंगपर्यंत. या सर्वांचा सखोल अभ्यास करा. ब्लॉगमध्ये ट्विंकलने म्हटले आहे की “हे फोटोशूट अंडर एक्सपोज आहे. कारण दुर्बिणीने  झूम करूनही काहीही दिसत नाही.”

ट्विंकलचे मत आहे की रणवीर सिंग विरुद्ध एफआयआर ही समाजातील एका वर्गाची प्रतिक्रिया आहे. यासोबतच तिने एका घटनेचाही उल्लेख केला, जी तिच्यासाठी लाजिरवाणी आहे. तिने सांगितले की, ती रिसर्चसाठी रणवीर सिंगच्या लॅपटॉपवर वारंवार झूम करत असताना अचानक तिचा मुलगा आला, ज्यामुळे ती लाजली. दरम्यान ट्विंकल खन्नाच्या या वक्तव्याची आणि रणवीर सिंगला दिलेल्या समर्थनाची सिने जगतात जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे.

याआधी अभिनेत्री विद्या बालननेही रणवीर सिंगच्या या फोटोशूटला समर्थन दिले आहे. ज्यामध्ये विद्या बालनने रणवीर सिंगच्या फोटोशूटवर तक्रार देणाऱ्या लोकांवर टिका करत अशा लोकांना काही कामे नाहीत अशी टिका केली होती.

हेही वाचा –

जेव्हा चालू चित्रपटातून निर्मात्याने अमिताभ बच्चन यांना दाखवला होता बाहेरचा रस्ता, असा घेतला बदला

‘तुमच्या जाण्याने कार्यक्रम बंद होणार नाही…’ शैलेश लोढा यांच्यावर पहिल्यांदाच साधला निशाणा

तोबा तोबा! दोन नाड्यांनी सांभाळला अभिनेत्रीचा ड्रेस, ४ तासातच १ लाख लोकांनी पाडला लाईक्सचा पाऊस

 

हे देखील वाचा