Thursday, July 18, 2024

ट्विंकल खन्नाने ‘या’ गोष्टीसाठी गायले गाणे ऐकून फॅन्स म्हणाले, ‘काहीही घे पण चूप बस”

कलाकारांना नेहमीच त्यांच्या तब्येतीची आणि डाएटची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी जवळपास सर्वच कलाकार गोड खाणे टाळतात. पण स्वतःवर किती ताबा असला तरी कधी ना कधी त्यांना देखील खायची इच्छा होतच असेल. मग अशा वेळेस कलाकार काय करतात? याचाच एक मजेदार व्हिडिओ अभिनेत्री आणि आता लेखिका झालेल्या ट्विंकल खन्नाने शेअर केला आहे.

बॉलिवूडमधील अतिशय स्पष्टवक्ता अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्ना (Twinkal Khanna) ओळखली जाते. प्रत्येक गोष्टीत अतिशय परखडपणे मते मांडणारी आणि आपली निष्पक्ष भूमिका सर्वांसमोर ठेवणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ती प्रत्येक राजनैतिक आणि सामाजिक मुद्द्यांवर स्वतःचा पक्ष सर्वांसमोर ठेवण्यासाठी ओळखली जाते. कोणाची आलोचना करताना देखील ती मागे पुढे बघत नाही. अक्षय कुमारची देखील ती अनेकदा सार्वजनिक ठिकाणी आलोचना करताना दिसते. अशातच ट्विंकलचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्या व्हिडिओवरून फॅन्स तिची आलोचना करत आहे.

ट्विंकलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला असून, या ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओमध्ये ट्विंकल डायनिंग टेबलवर बसलेली असून, ती कॉफी मग हातात घेऊन गाणे गाताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि सलमान खान यांच्या ‘साजन’ सिनेमातील ‘मेरा दिल भी कितना पागल है’ हे गाणे गाताना दिसत आहे. गाणे गाताना तिचा बेसुरा आणि कानाला टोचणारा आवाज सगळ्यांनाच हसवत आहे. हे गाणं ती तिच्या समोर असलेल्या लाडूंना पाहून गात असून, तिच्या पुढ्यात प्लेटमध्ये बेसनाचे लाडू ठेवले आहे. गाणे गाताना तिने गाण्याच्या शब्दांमध्ये देखील बदल केला असून, ‘खाने से डरता है’ असे गाताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सर्वच नेटकऱ्यांना तुफान हसवत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना ट्विंकलने कॅप्शनमध्ये लिहिले, “खाण्यासाठी किंवा नाही खाण्यासाठी हा एक असा प्रश्न आहे, ज्यांच्यासोबत हॅम्लेटला कधी वाद घालावा नाही लागला, कारण कोणी त्याला नाश्त्यामध्ये लाडू नव्हते दिले. माझा उपाय हा आहे की, मी माझ्या तोंडाला माझ्या गाण्यात इतके व्यस्त ठेऊ की, हे खाण्यासाठी माझे मन आणि कान असंतुष्टीत बदलून जातील.”

ट्विंकलने पुढे तिच्या फॅन्सला प्रश्न विचारत लिहिले की, “तुम्हाला माहित आहे की, तुम्ही गाणे गाण्यात भयानक आहात तरी तुमच्यापैकी किती लोकांना गाणे आवडते?” तिचे हे गाणे ऐकून लोकं तिला न गाण्याची विनंती करत आहे. तर काहींनी तिला सांगितले की, काहीही घे पण शांत शांत राहा.

हेही वाचा :

हे देखील वाचा