फिल्मस्टार्सच्या आयुष्यात बरेच चढ-उतार येतात. ज्यामुळे बर्याच स्टार्सचं जोडीदारासोबतचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचतं. मात्र, असे काही स्टार्सही आहेत ज्यांच्या अफेअरच्या बातम्या त्यांच्या लग्नानंतर खूप व्हायरल झाल्या. परंतु या कलाकारांच्या पत्नींनी आपल्या पतींवर विश्वास ठेवला आणि त्यांचे नातं दृढ ठेवले. अशाच काही कलाकारांबद्दल आज चर्चा करू ज्यांच्या अफेअरच्या बातम्या खूप व्हायरल झाल्या आहेत.
राज कपूर – नर्गिस दत्त
जेव्हा जेव्हा इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचा उल्लेख होतो तेव्हा राज कपूर आणि नर्गिस दत्त यांची नावे हमखास घेतली जातात. त्याकाळी या दोघांची लव्हस्टोरी प्रत्येकाच्या ओठांवर होती. १९४६ साली नर्गिस आणि राज कपूर यांची भेट झाली. नर्गिसशी झालेल्या पहिल्या भेटीनंतर राज कपूर तिच्या प्रेमात वेडे झाले. मात्र, नर्गिसच्या प्रेमात पडल्यानंतरही राज कपूर कधीच लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. वास्तविक, जेव्हा राज कपूर नर्गिसच्या प्रेमात पडले त्या काळात त्यांचे लग्न झाले होते. त्याचे लग्न कृष्णा मल्होत्राशी झाले होते. हे जमवलेलं लग्न होतं. पण त्यांच्या अफेअरची बातमी ऐकूनही पत्नीने संपूर्ण कुटुंबाला उत्तम प्रकारे हाताळले.
शाहरुख खान-प्रियांका चोप्रा
शाहरुख खानने गौरी खानशी लव्ह मॅरेज केलं होतं. शाहरुख आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक मानले जातात. पण तरीही किंग खानचं नाव प्रियंका चोप्राशी जोडलं गेलं होतं. असं म्हटलं जातं की किंग खानचे विवाहबाह्य संबंध माहित असूनही, गौरीने त्याला सोडले नाही तर त्याऐवजी त्याला ताकीद दिली. गौरीने शाहरुखला प्रियांकापासून दूर रहा आणि यापुढे तिच्याबरोबर कधीही काम करू नका असा इशाराच दिला होता. त्यानंतर शाहरुखने या कथित अफेअरवर ब्रेक लावला होता.
अजय देवगण-कंगना
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो बर्याच गंभीर शैलीत जगतो, पण वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई या चित्रपटाच्या वेळी कंगनाशी जवळीक वाढल्याच्या बातम्या आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांनीही एकत्र खूप वेळ घालवला. तिच्या नवऱ्याबद्दल कळताच काजोलने अत्यंत त्रागा केला. अजयला कंगनापासून दूर राहण्याची तिने ताकीद दिली अशी चर्चा आहे.
अक्षय कुमार-प्रियांका चोप्रा
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत अनेक हिट फिल्म्स दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या अफेअरची यादीही लांबली आहे. अक्षय कुमारचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. मात्र, त्याने अखेर ट्विंकल खन्नाशी लग्न केले. पण लग्नानंतरही अक्षय कुमारचे नाव प्रियंका चोप्राशी जोडलं जाऊ लागलं होतं. ट्विंकलने अक्षयला प्रियांकापासून दूर राहण्याची ताकीद दिल्याचं बोललं जाते.