×

Anek | ‘राष्ट्रभाषे’च्या वादादरम्यान व्हायरल होतोय ट्रेलरचा ‘तो’ सीन, बांधले जातायत आयुष्मानच्या कौतुकाचे पूल!

अलीकडेच, अचानक देशभरात भारताच्या ‘राष्ट्रभाषे’वरून वाद निर्माण झाला आहे. याच कारणावरून अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि किच्चा सुदीप (Kiccha Sudeepa) यांच्यात ट्विटर वॉरही रंगले होते. पण या सगळ्या वादात आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) आगामी चित्रपट ‘अनेक’चा ट्रेलर रिलीझ झाला. याचा एक सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आयुष्मान खुराना ‘राष्ट्रीभाषे’वर मोठा प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे. सेलिब्रिटींपासून ते चाहते आता या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

काय आहे ट्रेलरचा सीन?
खरं तर, काही दिवसांपूर्वी ‘अनेक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुरानाचा एक सीन आहे, ज्यामध्ये तो एका व्यक्तीसोबत कारमध्ये बसून भाषेबद्दल बोलत आहे. आयुष्मान खुराना त्या व्यक्तीला विचारतो, “सर, तुम्ही कोठून आहात?” यावर समोरून ‘तेलंगणा’ असे उत्तर येते. यावर आयुष्मान त्या व्यक्तीला म्हणतो, “साऊथ… पण साऊथ का?” अभिनेत्याच्या या प्रश्नावर ती व्यक्ती म्हणते, “कारण मी दक्षिण भारतातील आहे.” (twitter reacts to viral scene from ayushmann s anek amid national language)

या संभाषणात आयुष्मान खुरानाने आणखी प्रश्न केला की, “तुम्हाला काय वाटते, मी कुठून असेल?” यावर ती व्यक्ती म्हणते, “उत्तर भारत, कारण तुमची हिंदी स्पष्ट आहे.” यावर आयुष्मान म्हणतो, “म्हणून हिंदी ठरवते की कोण उत्तरेकडून आहे आणि कोण दक्षिणेतून? कसे ठरवले जाते की, एखादा उत्तर भारतीय नाही, दक्षिण भारतीय नाही, पूर्व भारतीय नाही, फक्त भारतीय आहे?” अभिनेत्याचा हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

आपल्या चित्रपटाचा हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करताना आयुष्मान खुरानाने लिहिले की, “भाषा अनेक आहेत, पण देशाचा आत्मा एकच आहे, कोण जिंकणार? भारत!” या व्हिडिओवर कमेंट करत तापसी पन्नूने (Taapsee Pannu) लिहिले, “मनुष्य फक्त भारतीय कसा असतो? किती जबरदस्त पंच आहे हा, जिंदाबाद.” राजशेखरने (Rajsekhar) लिहिले, “काही दिवसांपूर्वी किच्चा सुदीपने हिंदी भाषेवर प्रश्न उपस्थित केला होता, ज्याने वादाचे रूप धारण केले होते. याचे समाधान? सगळे भारतीय काय करत आहेत, याची झलक पाहण्यासाठी ट्रेलर पहा.”

कधी प्रदर्शित होतोय चित्रपट?
हा चित्रपट अनुभव सिन्हा लिखित आणि दिग्दर्शित आहे. भूषण कुमारच्या टी-सीरीज आणि अनुभव सिन्हा यांच्या बनारस मीडिया वर्क्स यांनी संयुक्तपणे चित्रपटाची निर्मिती केली आहे. आयुष्मान व्यतिरिक्त या चित्रपटात आंद्रिया केविचसा, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा इत्यादी कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट २७ मे २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post