उदय चोप्रा हा एक नावाजलेला निर्माता आणि अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. प्रेक्षकांनी त्याच्या चित्रपटांना खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. अशातच बुधवारी (५ जानेवारी) तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास माहिती.
उदय चोप्रा याचा जन्म ५ जानेवारी १९७३ साली झाला आहे. त्याचा भाऊ आदित्य चोप्रा आणि त्याचे वडील देखील चित्रपटसृष्टीत होते, तरी देखील त्याला पाहिजे तसे त्याच्या करिअरमध्ये यश मिळाले नाही. त्याने ‘मोहाबते’ या चित्रपटातून त्यांच्या करीअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप गेले. परंतु कमाईच्याबाबत तो अजिबात मागे पडला नाही. त्याचे नेटवर्थ जाणून तुम्हीही हैराण व्हाल. (Udya chopra celebrate his birthday let’s know about his life)
उदय चोप्रा याच्या घरातील एकंदरीत वातावरण चित्रपटसृष्टीशी निगडित असल्याने त्याला आधीपासून या सृष्टीचा अनुभव होता. त्याचे वडील यश चोप्रा यांच्यासोबत काम केल्यानंतर त्याने १९९४ मध्ये अक्षय कुमार, काजोल आणि सैफ अली खान यांच्यासोबत ‘दिल्लगी’ या चित्रपटात काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. त्यानंतर त्याला असे वाटले की, आता त्याला हिरो म्हणून काम केले पाहिजे. त्याने ‘मोहाबते’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात त्याने शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांसारख्या कलाकारांसोबत काम केले. परंतु या चित्रपटातून देखील त्याला खास ओळख मिळाली नाही.
उदय चोप्राला ‘धूम’ या चित्रपटात काम केल्यानंतर खूप चांगली ओळख मिळाली. या चित्रपटातील त्याचा अभिनय सगळ्यांना खूप आवडला होता. त्यानंतर त्याने ‘मेरे यार की शादी है’, ‘निल और निक्की’ यांसारख्या चित्रपटात काम केले.
उदय चोप्रा सध्या त्याचा भाऊ आदित्य चोप्रासोबत वाईआरएफ एंटरटेन्मेंट आणि यशराज फिल्म्स यांच्या कामात मदत करतो. यासोबतच त्याची स्वतःची योमिक्स नावाची कंपनी आहे. माध्यमातून वृत्तानुसार उदय चोप्राचे नेटवर्थ ५ मिलियन डॉलर म्हणजे ३८ कोटी रुपये एवढे आहे.
हेही वाचा :
टेलिव्हिजनवरील ‘या’ खलनायिकांचा सोशल मीडियावर जलवा, पाहायला मिळाला भन्नाट डान्स
अली फजलच्या पोस्टवर ‘वंडर वुमन’कडून प्रेमाचा वर्षाव, ‘या’ सिनेमात झळकणार एकत्र
महिलांच्या लिलावाबाबत जावेद अख्तरांचा थेट पंतप्रधानांना सवाल; म्हणाले, ‘हीच आहे का…?’