Monday, August 4, 2025
Home अन्य मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल

‘बिग बॉस १५’ चा पहिला आठवडा पार झाला आहे. चाहतेही त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना सोशल मीडियावर जोरदार पाठिंबा देत आहेत. यावेळी शोमध्ये बिग बॉसचा माजी स्पर्धक आसीम रियाजचा भाऊ उमर रियाज देखील आहे. उमर जेव्हा ‘बिग बॉस १५’ मध्ये प्रवेश करत होता, तेव्हा त्याचा भाऊ आसीमही त्याच्यासोबत दिसला होता. तो उमरला घरापर्यंत सोडायला आला होता. अशा परिस्थितीत आसीमचे चाहते त्याच्या भावाला खूप पाठिंबा देताना दिसत आहेत.

हँडसम उमर व्यवसायाने डॉक्टर आहे. मात्र तो बऱ्याच काळापासून मनोरंजन विश्वात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. घरामध्ये आतापर्यंतच्या प्रवासात उमर कूल दिसत होता. पहिल्या आठवड्यात तो फारसा सक्रिय दिसला नाही. पण चाहत्यांना आशा आहे की, त्याच्या भावाप्रमाणे तो देखील शोमध्ये धमाल करेल.

लेटेस्ट एपिसोडमध्ये, उमर रियाझने ईशान सेहगल आणि मायशा अय्यर यांच्यातील नात्यावर कमेंट केली. तो मायशा आणि ईशानसमोर म्हणाला की, ते त्यांच्या नात्याबद्दल ठाम नाहीयेत. उमरच्या या कमेंटवरून दोघांमध्ये भांडणही झाले. यानंतर, मायशाने एलिमिनेशनच्या टास्कमध्ये आसीम रियाझचे नाव घेतले. त्यावेळी उमरने स्पष्ट केले की, मायशा-ईशानच्या प्रेमकथेला जज करणारा तो कोण आहे?

 

उमर रियाजचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

चाहते त्याला हुशार, खरा माणूस तसेच मास्टर माइंड म्हणत आहेत. उमरच्या चाहत्यांना वाटते की, त्याच्याकडे परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्याची क्षमता आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा