मागील एक आठवड्यापासून सोशल मीडियावर एकाच गाण्याची जोरदार चर्चा चाललेली आहे. सगळ्यांच्या ओठावर एकच गाणे ते म्हणजे ‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार मुझे भूल नही जाना रे’. एका लहान मुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर एवढा व्हायरल होत आहे की, सोशल मीडियावर सगळीकडे हे गाणे प्रसिद्ध झाले आहेत. अनेकांनी या मुलाच्या व्हाइसमध्ये रिल्स देखील केले आहे. त्यामुळे सगळीकडे फक्त याच गाण्याचे बोल ऐकू येत आहेत. अनेक कलाकारांनी देखील या गाण्यावर रिल्स केले आहेत. यातच मराठमोळी जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी देखील या गाण्यावर व्हिडिओ केला आहे.
उमेश कामतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आणि प्रिया बापट ‘बचपन का प्यार’ या गाण्यावर हावभाव देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. उमेशने ब्राऊन कलरचे ब्लेजर घातले आहे तर प्रियाने देखील ब्राऊन कलरचा ड्रेस घातला आहे. हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “बचपन का प्यार आणि काय हवं.” त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. अनेकजण त्यांच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहे. यातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने कमेंट केली आहे की, “अरे देवा मला अजूनही विश्वास बसत नाहीये, की तुम्ही हे केलं आहे.” यासोबतच तिने हसण्याचे ईमोजी पोस्ट केली आहे. (Umesh Kamat and priya bapat bachapn ka pyar dance video viral on social media)
उमेश कामत काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा प्रकरणामुळे खूप चर्चेत आला होता. काही वृत्त वाहिन्यांनी राज कुंद्राचा पीए उमेश कामत याच्या नावासोबत अभिनेता उमेश कामत याचा फोटो दाखवला होता. यावर उमेश कामतने पोस्ट करून या गोष्टीची माहिती दिली होती. तसेच तो याबाबत तक्रार करणार आहे, असे देखील सांगितले होते. प्रिया आणि उमेश हे दोघेही मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. उमेश सध्या सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत काम करत आहे. तर प्रियाने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल
-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख