Monday, July 1, 2024

अज्ञात व्यक्तीने केली जॉनी डेपच्या घरात घुसखोरी, दारुचे घोट आणि बाथरुममध्ये घेतली आंघोळीची मजा

‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या, जॉनी डेपबद्दल घडलेली एक विचित्र घटना समोर आली आहे. हॉलिवूड हिल्समधील अभिनेता जॉनी डेपच्या घरात एक अज्ञात व्यक्ती आत शिरताना दिसली.

वास्तविक जॉनी डेपच्या घरामागील तलावाजवळ ही अज्ञात व्यक्ती फिरताना दिसली होती. शेजार्‍यांनी अज्ञात व्यक्तीला पाहताच, तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. वृत्तानुसार, डेपच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा या लोकांनी अज्ञात व्यक्तीला तिथे असल्याबद्दल विचारले, तेव्हा तो गेटवरून उडी मारून आत गेला.

ती व्यक्ती केवळ परवानगीशिवाय जॉनी डेपच्या घरात शिरलीच नाही, तर जेव्हा पोलिस तेथे पोहचले तेव्हा तो बाथरूममध्ये स्नान करत होता. पोलिसांनी त्याला गेट उघडण्यास सांगितले, तेव्हा त्याने नकार दिला. इतकेच नव्हे, तर त्याने अभिनेत्याच्या घरात असलेल्या त्याच्या खासगी बारमधून मद्यपानाचे मजेही घेतले. या व्यक्तीविरूद्ध दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे जॉनी डेपच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जानेवारीच्या सुरुवातीलाही एका अज्ञात महिलेने जॉनीच्या घरात अशाच प्रकारे प्रवेश केला होता. जॉनी डेपच्या बाबतीत असे का घडत आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तथापि, असे मानले जात आहे की, जानेवारीत जॉनीच्या घरी आलेली ही अज्ञात महिला त्याची चाहती असावी.

याव्यतिरिक्त, जॉनी डेप आजकाल अंबर हर्डशी घटस्फोट आणि कायदेशीर वादाबद्दल चर्चेत आहे. अंबरकडून जॉनीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करण्यात आला होता. मात्र अभिनेत्याने हा आरोप फेटाळून लावला. व्हेनेसा पॅराडिस हिच्याशी नाते संपल्यानंतर, डेपने अभिनेत्री अंबर हर्डला डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यांची पहिली भेट 2009 मध्ये ‘द रम डायरी’च्या सेटवर झाली होती. पुढे फेब्रुवारी 2015 मध्ये त्यांनी लग्न केले होते.

हे देखील वाचा