Thursday, April 25, 2024

‘द एम्पायर’ वेबसीरिजमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म ‘हॉटस्टार’ अडचणीत; नेटकरी म्हणाले, ‘जो प्रभू श्रीरामाचा नाही…’

भारतात मुघल साम्राज्याबद्दल अनेकदा वाद होताना आपण पाहिले आहेत. इतकेच नव्हे, तर गेल्या काही वर्षांपासून, सोशल मीडियावर देखील या मुद्द्यासंदर्भात विचारधारेचा संघर्ष दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक कबीर खान यांनी मुघलांनी राष्ट्र उभारणीत उल्लेखनीय योगदान दिल्याचे सांगून या वादाला आणखी हवा दिली आहे.

या दरम्यान ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म हॉटस्टार शुक्रवारी ‘द एम्पायर’ ही वेब सिरीज प्रदर्शित करून अडचणीत आले आहे. निखिल आडवाणी निर्मित या शोमध्ये शबाना आझमी, डिनो मोरिया, दृष्टि धामी, कुणाल कपूर, आदित्य सील, सहर बंबा, राहुल देव आणि इतर अनेक प्रभावी स्टार कास्ट आहे. (uninstall hotstar know why uninstallhotstar trending on twitter the empire web series users gives angry reaction)

हा शो बाबरच्या कथेवर आधारित आहे. ही मालिका ऍलेक्स रदरफोर्डच्या ‘एम्पायर ऑफ द मोगल: राइडर्स फ्रॉम द नॉर्थ” या कादंबरीवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या सिरीजमुळे हॉटस्टारवर प्रेक्षक आगपाखड करताना दिसत आहेत. तर ‘#UninstallHotstar’ हे हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे.

ट्रेलरनंतर नोंदवली होती तक्रार
‘माहिती तंत्रज्ञान नियम २०२१’ अंतर्गत हॉटस्टार अधिकाऱ्यांना या सिरीजबद्दल तक्रार मिळाली होती. या सिरीजमध्ये बाबरचा गौरव करण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले गेले होते. परंतु अधिकाऱ्याने ही सिरीज बाबरचा गौरव करत नसल्याचे सांगून फेटाळून लावली. शिवाय हॉटस्टारने सांगितले होते की, त्यांनी सिरीजमध्ये वादग्रस्त असे काहीही दाखवले नाही.

ट्विटरवर ट्रेंड होतंय ‘UninstallHotstar’ हॅशटॅग
‘द एम्पायर’ प्रदर्शित झाल्यापासून ‘UninstallHotstar’ हे हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे. युजर्स हॉटस्टार अनइंस्टॉल करत आहेत आणि त्याचे प्रिंटशॉट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हॉटस्टार अनइंस्टॉल केल्यानंतर, गुगल प्ले स्टोअरवरील एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, “जो प्रभू श्री रामचा नाही, तो कोणाचाही नाही.”

ट्विटरवर युजर्स हॉटस्टारवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. त्या ट्विटर पोस्टवर एक नजर टाकूया, ज्याद्वारे युजर्सने आपला राग व्यक्त केला आहे.

‘द एम्पायर’मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो बाबरच्या त्या युगाबद्दल सांगेल, जेव्हा तो मुघल साम्राज्याचा सम्राट नव्हता आणि शैबानी खानने त्याचे आयुष्य कठीण केले होते. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, शैबानी खानवर मात करणे बाबरला शक्य नव्हते. यात बाबरची भूमिका कुणाल कपूरने साकारली आहे, तर शैबानी खानची भूमिका डिनो मोरियाने साकारली आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

-केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

हे देखील वाचा