Thursday, July 18, 2024

खुशखबर! सनी देओलचा बॉलिवूडमध्ये कमबॅक, ‘सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेल्या ‘चुप’ मध्ये दिसणार अभिनेता

बॉलिवूड अभिनेता सनी देओल नुकताच चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट या चित्रपटातून कमबैक करत आहेत. 90 च्या दशकापासून सनी देओलने खूपच गाजलेल्या चित्रपटामध्ये काम केले आहे. तो त्यावेळचा खूपच गाजलेला आभिनेता होता त्याचे आजही लाखो चाहते आहेत. तो चित्रपटामध्ये झळकणार असल्याने त्याचे चाहते खूपच उत्सुक आहेत चला तर जाणून घेउया त्याच्या चित्रपटाविषयी.

सनी देओल (Sunny Deol) आगामी येणाऱ्या चुप:रिवेंज ऑफ द आर्टिस्ट (Chup Sunny Deol) या चित्रपटातून कमबॅक करत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टिझर लाॅंच झाला आहे. या चित्रपटामध्ये सस्पेंन्स थ्रिलर आणि ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे. याच्या ट्रेलरमध्ये सनी देओलचा एंग्री फेस बघायला मिळणार आहे जो आधीच्या चित्रपटामध्ये दिसत होता. या चित्रपटामध्ये दुलकार सलमान,पुजा भट्ट, आणि श्रेया धनवंतरी असे कलाकार पाहायला मिळणार आहे. 1 मिनिट 58 सेकंदाचा  ट्रेलर पाहुन लोकांच्या अंगावर काटा येइल.

अक्षय कुमारने शेअर केला ट्रेलर 

अक्षय कुमार नेही आपल्या इंन्साग्राम अकाउंटवर चित्रपट चुप:रिवेंज ऑफ द आर्टिस्ट चा ट्रेलर शेअर केला आहे. आणि आपला मित्र आर बाल्की याला त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट एका कलाकाराची आहे जो एक खतरणाक सिरियल किलर बनतो तो फक्त फिल्म क्रिटीक्सला निशाना बतनवत असतो आणि त्याचा खूने करण्याचा अंदाजही वेगळा दाखवला आहे. हा सिरियल किलर जुने चित्रपट शोधून त्यांना आपला निशाना बनवून त्याच अंदाजात मर्डर करतो.

बिग बी बनले म्युजिक कंपोजर

चुप या चित्रपटाची स्टोरी  निर्माता आर बाल्की यांनी लिहिली आहे. या चित्रपटाला त्यांनी अभिनेता-दिग्दर्शक गुरु दत्त यांना ट्रीब्युट केली आहे. हा चित्रपट 23 सप्टेंबरला जवळच्या चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे संगित अमिताभ बच्चन यांनी कंपोज केले आहे. अता बीग बी अभिनय आणि सिंगग शिवाय ते कंपोजरही बनले आहेत.

सनी देओल  या चित्रपचाद्वारे आहला कमबैक करत आहेत. त्यांच्या परतण्याच्या बातमीने चाहत्यामध्ये खूपच उत्सुकता वाढली आहे. रिवेंज ऑफ द आर्टिस्ट या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.  अता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती धमाल करेल हे लवकरच कळेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
रिलीजच्या आधीच आला ‘ब्रह्मास्त्र’चा बीटीएस व्हिडिओ, तलवारबाजी करताना दिसले अमिताभ बच्चन
प्रपोज करायला घाबरत होता सुपरस्टार यश, वाचा राधिका पंडित आणि यशची भन्नाट लवस्टोरी
प्रपोज करायला घाबरत होता सुपरस्टार यश, वाचा राधिका पंडित आणि यशची भन्नाट लवस्टोरी

हे देखील वाचा