Tuesday, July 9, 2024

हाय हाय फॅशन! चक्क कचऱ्याच्या पिवशीपासून उर्फी जावेदने बनवला ड्रेस, क्रिएटिव्हिटीला मिळाली दाद

उर्फी जावेद हे नाव माहित नसलेली एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. मनोरंजनविश्वापासून ते आता राजकीय विश्वपर्यंत उर्फीची महती पसरली आहे. अतरंगी कपड्यांसोबतच बिनधास्त, मनमौजी, फटकळ स्वभावामुळे उर्फी ओळखली जाते. मधल्या काळात उर्फी आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादामुळे ती चांगलीच गाजली. उर्फी नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सक्रिय असते आणि तिचे चित्रविचित्र वेशभूषेतील फोटो पोस्ट करत असते. उर्फी म्हटले तरी काहीतरी हटके आणि अतरंगी वेषभूषाच असणार हे आता सर्वांनाच माहित झाले आहे. अभिनयात काम करण्याच्या इच्छेने मुंबईत आलेल्या उर्फीने खूप प्रयत्न करूनही यश तिला लाभले नाही. मग तिने तिचा फॅशन सेन्स वापर आणि ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली.

उर्फी सोशल मीडियावर तिचे फोटो टाकते ते अतिशय हटके आणि सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडचे असतात. तिने आतापर्यंत साइकिलची चेन, मोराचे पंख, मोबाइल फोन, सिम कार्ड, फोटो, कॅसेटची रीळ, घड्याळ, चिकटपट्टी, दगड आदी अनेक वस्तूंपासून ड्रेस बनवले होते. मात्र आता तर तिने चक्क कचऱ्याच्या पिशवीपासूनच ड्रेस बनवले आहे. या ड्रेसचा तिने एक व्हिडिओ शेअर केला असून, यात तिने काळ्या रंगाच्या पिशवीपासून दोन वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस बनवले आहे. अशा प्रकारचा ड्रेस तिने ओटीटी वरील बिग बॉसमध्ये देखील घातला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीने तिच्या या ड्रेसचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “मी खरोखर हा ड्रेस घालून रेड कार्पेटवर जाऊ शकते. मी मजाक करत नाही. मी कोमल पांडेची प्रेरणा घेऊन बिग बॉसमध्ये अशा कचऱ्याच्या पिशवीपासून ड्रेस बनवला होता.” तर तिने शेअर केलेल्या व्हिडिओवर लिहिले होते की, “जेव्हा मी बिग बॉसमध्ये होती तेव्हा मी कचऱ्याच्या पिशवीपासून ड्रेस बनवला होता. चला इतिहासाला पुन्हा उजाळा देऊ, मात्र अधिक चांगल्या पद्धतीने.”

उर्फीचा हा व्हिडिओ पाहून तिच्यावर टीका करणारे नेटकरी देखील तिच्या कल्पनाशक्तीला दाद देत तिचे कौतुक करत आहे. अनेकांनी तिला यावेळेस ट्रोल करण्यापेक्षा तिचे कौतुक करणेच पसंत केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही चित्रपट केलेच नाहीत तर…’, बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर बोलली प्रसिद्ध अभिनेत्री

केएल राहुल अन् अथियाच्या संगीतात ‘बेशरम रंग’वर थिरकले स्टार, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा