Friday, July 5, 2024

अतरंगी फॅशन्सन्समुळे नावारूपाला आलेल्या उर्फीने सहन केले वडिलांचे खालच्या पातळीवरचे टॉर्चर

उर्फी जावेद हे नाव आता लोकांसाठी नवीन नाही. सतत आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे प्रकाशझोतात येऊन प्रसिद्धी मिळवणाऱ्या उर्फीला तिच्या या अतरंगी फॅशनने प्रसिद्धी मिळवून दिली. तिचे दररोज वेगवगेळ्या रुपातले कपड्यांमधले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी कधी लोकांना वाटते की उर्फीच्या कल्पकतेचे कौतुक करावे की, तिचे कपडे पाहून तिला ओरडावे. आपल्या सामान्य लोकांच्या कल्पनेपलीकडे जाऊन उर्फी तिचे कपडे डिझाइन करते. यावरील तिला बऱ्याचदा किंबहुना नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आज तिची इमेज एकदम बिनधास्त मुलगी अशी असली तरी एकवेळ अशी होती जेव्हा तिने अतीव दुःख सहन केले आहे.

उर्फी जावेद ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री असली तरी तिला खरी ओळख बिग बॉस ओटीटीची स्पर्धक झाल्यानंतर मिळाली. शो जिंकली नसली तरी तिला या शोमुळे तुफान फायदा झाला. त्यानंतर ती सतत चर्चेत राहिली. काही दिवसांपूर्वी उर्फीने एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील काही खळबळजनक खुलासे केले. यादरम्यान तिने तिच्या वडिलांविरोधात अशा काही गोष्टी सांगितल्या त्या ऐकून सर्वच स्तब्ध झाले. तिच्या वडिलांनी तिला सतत दोनवर्ष शारीरिक आणि मानसिक रूपाने त्रास दिला आहे. जेव्हा ती ११ मध्ये शिकत होती तेव्हा तिचा फोटो कोणीतरी एका अडल्ट साईटवर टाकला यानंतर तिला सर्वात जास्त त्रास झाला. या घटनेनंतर तिला घरच्यांनी देखील मदत केली नाही.

पुढे मुलाखतीमध्ये उर्फीने सांगितले की, ” या घटनेनंतर माझ्यासाठी येणार काळ सर्वात जास्त कठीण होता. घरच्यांनी मलाच दोष दिला. मला पॉर्न स्टार देखील म्हटले. माझ्या वडिलांनी तर मला २ वर्ष टॉर्चर केले. मला माझे नाव देखील आठवत नव्हते. लोकं तर मला खूप घाण घाण शिव्या देऊन बोलवायचे. मला तर काही बोलण्याचे स्वातंत्र्य नव्हते. १७ वर्ष मला फक्त एवढेच माहित होते की, फक्त पुरुषच बोलू शकतात. मी माझे घर सोडल्यानंतर मला जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मात्र हळू हळू सर्व ठीक झाले.” पुढे तिने हे देखील सांगितले की, ती ज्या दुःखातून गेली ते दुःख कोणत्याच मुलीच्या नशिबी नको यायला.

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला होता, ‘दीपिका माझ्यासाठी दाल चावलसारखी होती…’
इंजिनिअरिंग सोडून ‘या’ कलाकारांनी अभिनयात आजमावले नशिब, आज आहेत बॉलिवूडचे स्टार

हे देखील वाचा