Monday, April 21, 2025
Home टेलिव्हिजन ‘मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू’, उर्फी पुन्हा चित्रा वाघ यांच्याशी नडली

‘मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू’, उर्फी पुन्हा चित्रा वाघ यांच्याशी नडली

सध्या देशभरात एक विषय जोरदार रंगल्याचे दिसत आहे. तो म्हणजे, उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील वाकयुद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. दोघीही एकमेकींवर सातत्याने टीकास्त्र डागताना दिसत आहेत. उर्फीने चित्रा यांची माफीदेखील मागितली आहे. मात्र, ती एवढ्यावरच थांबली नाही. तिने एक ट्वीट करत निशाणा साधला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आरोप लावला आहे की, उर्फी जावेद (Urfi Javed) सार्वजनिक ठिकाणी कमी कपड्यात फिरते. यामुळे समाजातील वातावरण बिघडत आहे. उर्फीनेही चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. उर्फीने जे ट्वीट केले आहे, ते सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये उर्फी जावेद चित्रा वाघ (Urfi Javed Chitra Wagh) यांना सासू म्हणत आहे.

उर्फी जावेद हिचे ट्वीट
उर्फीने नुकतेच एक ट्वीट केले आहे. यामध्ये तिने लिहिले की, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू.” म्हणजेच, उर्फी म्हणत आहे की, तिचा डीपी एकदम भन्नाट आहे आणि चित्रा तिची सासू आहे. खरं तर उर्फीने ट्विटर अकाऊंटला जो डीपी वापरला आहे, त्यात ती बोल्ड ड्रेसमध्ये आहे.

उर्फीच्या या ट्वीटवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एकाने लिहिले की, “उर्फी एकमेव अशी सून असेल, जी सासूला छळत असेल.”

दुसऱ्या एकाने म्हटले की, “खूपच हसवता उर्फी जी.”

यापूर्वीचे ट्वीटही चर्चेत
उर्फी जावेद हिने यापूर्वी केलेले ट्वीटही जोरदार चर्चेत आहे. उर्फी हिने ट्वीट करत एक फोटो शेअर केला होता, ज्यात ती गुलाबी रंगाच्या ब्लाऊज आणि लेहंग्यात दिसली होती. तिने ट्वीट करत लिहिले होते की, “परंतु अजूनही बरीच सुधारणा बाकी आहे. माफ करा चित्रा वाघ जी. माझे तुमच्यावर प्रेम आहे.”

उर्फीने हे ट्वीट चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतर शेअर केले होते. चित्रा वाघ यांनी म्हटले होते की, ती सार्वजनिक ठिकाणी कमी कपड्यात असते. मात्र, आता तिने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये ती पूर्ण कपड्यांमध्ये आहे. फक्त यामध्ये तिचा ब्लाऊज बॅकलेस आहे. आता नेटकरी यावर चर्चा करत आहेत. (Uorfi Javed tweet on BJP leader Chitra Wagh goes to viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शाहरुखसोबत काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, 26व्या वयात बनणार नवरी
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नावर ‘या’ तिसऱ्याच व्यक्तीने केले शिक्कामोर्तब?, व्हिडिओ वायरल

हे देखील वाचा