Sunday, February 1, 2026
Home टेलिव्हिजन ‘कार्टून नेटवर्क’ म्हणत नेटकऱ्यांनी उडवली उर्फी जावेदच्या जीन्स लूकची खिल्ली

‘कार्टून नेटवर्क’ म्हणत नेटकऱ्यांनी उडवली उर्फी जावेदच्या जीन्स लूकची खिल्ली

उर्फी जावेद नेहमीच विचित्र अतरंगी कपडे घालून मीडियासमोर येते आणि लाईमलाइट मिळते. उर्फी नाव उच्चारले तरी काहीतरी हटके आणि कल्पनेपलीकडील फॅशन असणार हे आधीच सर्वाना समजते. उर्फीचे आतापर्यंतचे ट्रॅक रेकॉर्ड बघता ती सामान्य लोकांप्रमाणे कपडे घालत नाही हे तर सर्वाना माहीतच आहे. त्यामुळे उर्फीच्या फॅशनवर जे काही लिहिले जाते ते वाचताना लोकं नक्कीच आता या वेळेस तिने काय नवीन डोके लावले असेल या विचार करत असतील. टेलिव्हिजन अभिनेत्री असणारी उर्फी पुन्हा एकदा तिच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत आली आली आहे. नुकताच उर्फीचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने जीन्सवर प्रयोग केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने डेनिम जीन्स घातली असून, त्यावर टॉप ऐवजी जीन्स घातलेली दिसत आहे. अर्थात तिने टॉप आणि बोलतां दोन्ही ठिकाणी जीन्सच घातली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी तिच्या या लूकवर भरपूर प्रश्न विचारले आहे. एकाने लिहिले, ‘असे का केले आहे?’ त्यावर उर्फीने उत्तर दिले ऐनवेळी माझा ड्रेस खराब झाला आणि मला घाईघाई मध्ये माझ्या जीन्सला फाडून त्याचा टॉप बनवावा लागला.

उर्फी जावेदच्या हा लूक खूपच फनी दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. एकाने लिहिले, “बस हेच पाहायचे बाकी होते.’, दुसऱ्याने लिहिले, “हे काय आहे यार…पण तरीही मागच्या वेळेपेक्षा ठीक आहे.’, अजून एकाने लिहिले, “हिला नक्कीच डॉक्टरांची गरज आहे.’, एकाने तर लिहिले, ‘इथे कार्टून नेटवर्क चालू झाले आहे.’

उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांमुळे प्रकाशझोतात येते. मात्र तिला लाईमलाइट मिळण्यापेक्षा जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. तिच्या कपड्यांमुळे ती वादांमध्ये देखील अडकली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांची भन्नाट केमिस्ट्री असणाऱ्या ‘शिव शास्त्री बलबोआ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
‘आई झाल्यानंतर सपनाचं करिअर संपलं’ म्हणणाऱ्यांची सपना चौधरीने घेतली शाळा; म्हणाली…

हे देखील वाचा