Thursday, March 13, 2025
Home मराठी मराठी सिनेसृष्टीत येतंय सिक्वेलचं वादळ, ‘या’ ५ चित्रपटांचे पुढील भाग होणार प्रदर्शित

मराठी सिनेसृष्टीत येतंय सिक्वेलचं वादळ, ‘या’ ५ चित्रपटांचे पुढील भाग होणार प्रदर्शित

मराठी सिनेसृष्टीत येत्या काळात सिक्वेलचे वारे वाहताना दिसणार आहे. जवळपास पाच गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल जुलै-ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. यात टाईमपास, दे धक्का, टकाटक, दगडी चाळ आणि बॉईज या चित्रपटांचे सिक्वेल आगामी काळात पाहायला मिळणार आहेत. त्यातील टाईमपास आणि बॉईज या चित्रपटांचा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. तसेच दे धक्का, टकाटक, दगडी चाळ या चित्रपटांचा दुसरा भाग येणार आहेत.

२९ जुलैला ‘टाईमपास ३’, ५ ऑगस्टला ‘दे धक्का २’, १८ ऑगस्टला ‘दगडी चाळ २’ आणि १९ ऑगस्टला ‘टकाटक २’ चित्रपट रिलीज होणार आहेत. तसेच सप्टेंबरमध्ये ‘बॉईज ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा