Monday, July 1, 2024

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘हे’ बहुप्रतिक्षित चित्रपट आणि वेबसिरीज होणार प्रदर्शित, पाहा त्यांची पूर्ण यादी

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि चित्रपटगृह उघडण्याची घोषणा होताच हिंदी चित्रपट जगतात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक चित्रपट आणि वेबसिरीज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाल्या आहेत. या आगामी चित्रपटांची आणि वेबसिरीजची उत्सुकता चाहत्यांना खूपच आहे.

दिवाळीचा सण हा हिंदी चित्रपटसृष्टीत महत्वाचा मुहूर्त मानला जातो. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक चित्रपट आणि वेबसिरीज प्रदर्शित करण्याकडे निर्मात्यांचा कल असतो. परंतु गेल्यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रपटगृह बंद होती. त्यामुळे अनेक चित्रपट प्रदर्शितच झाले नाही. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि चित्रपटगृह उघडण्याची घोषणा झाल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदी चित्रपट क्षेत्रात अनेक चित्रपट आणि वेबसिरीज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना या सर्व चित्रपटांची उत्सुकता आहे. पाहूया लवकरच प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेबसिरीज यांची संपूर्ण यादी.

सूर्यवंशी :
अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफचा बहुचर्चित ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट दिवाळीच्या दिवशीच म्हणजे ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून उत्सुक आहे. चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंगसुद्धा महत्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट गेल्यावर्षीच प्रदर्शित होणार होता परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि चित्रपटगृह बंद असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन रखडले होते. आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अन्नात्थे :
रजनीकांत, नयनतारा आणि किर्ती सुरेश अशा दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला ‘अन्नात्थे’ चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रजनीकांतच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

मीनाक्षी सुंदरेश्वर :
अभिमन्यु धसानी आणि सान्या मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ चित्रपट ५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात झळकणार आहे. विवेक सोनी दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला हा एक रोमॅंन्टिक कॉमेडी चित्रपट आहे.

जय भीम :
दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा बहुचर्चित ‘जय भीम’ चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २ नोव्हेंबरला अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

नो मीन्स नो :
हा एक इंडो पोलिश रोमँटिक थरारपट आहे. G 7 पोलेंडची निर्मिती असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास वर्मा यांनी केले आहे. चित्रपटात ध्रुव वर्मा, गुलशन ग्रोवर, शरद कपूर आणि अन्ना गुजिक यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ही एका भारतीय स्कि चॅम्पियनची कथा आहे जो पोलंडमध्ये स्कि चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतो. चित्रपट ५ नोव्हेंबरला विविध देशांतील चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

अक्कड बक्कड रफू चक्कर :
ही एक बहुचर्चित वेबसिरीज असून ३ नोव्हेंबरला अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बोगस बँकेची स्थापना करून घोटाळा करणार्‍या २ मित्रांची कथा दाखविण्यात आली आहे. या वेबसिरीजमध्ये एकूण १० भाग असून मंदिरा बेदी यांचे पती आणि दिवंगत दिग्दर्शक निर्माते राज कौशल यांचा हा शेवटचा प्रोजेक्ट आहे.

इटरनल :
चमत्कारिक विश्वातील ‘इटरनल’ ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती मार्वल स्टुडिओने केली आहे. चित्रपटात जेम्मा चान, रिचर्ड मेडेन, कुमैल नानजियानी, लिया मॅकहूग,ब्रायन टायन हेनरी, लॉरेन रिडलॉफ, बैरी किओघन, डॉन ली, हरीश पटेल, किट हरिंगटन, सलमा, हायेक आणि एंजेलिना ज्युलीसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

हम दो हमारे दो :
राजकुमार राव आणि क्रिती सेनन यांचा ‘हम दो हमारे दो’ चित्रपट डिस्नेप्लस हॉटस्टारवर २९ ऑक्टोंबरला प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. चित्रपटात परेश रावल, राजकुमार राव, क्रिती सेनन आणि रत्ना पाठक आणि अपारशक्ति खुराना सारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भर गर्दीत ‘मन्नत’च्या बाहेर हनुमान चालीसाचा जप करताना दिसले पंडितजी, पाहा व्हिडिओ

-मोठी बातमी! आर्यन खान आर्थर रोड कारागृहातून बाहेर, लवकरच होणार मन्नतवर रवाना

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

-काय सांगता! जामीन तर मिळणार, परंतु न्यायालयाने आर्यनसमोर ठेवल्या ‘या’ एकूण ११ अटी

हे देखील वाचा