Wednesday, July 3, 2024

‘…तर मला वाटतं मी अभिनयाचं दुकानच बंद केलं पाहिजे’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच खळबळजनक भाष्य

मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जाणारे उपेंद्र लिमये (Upendra Limaye) सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात. त्यांनी त्यांच्या अभिनयच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांनी अनेक मालिका (Upendra Limaye Serials) आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. उपेंद्र लिमये यांनी नुकतीच एका मुलाखतीमध्ये सोशल मीडिया विषयी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सोशल मीडियावर नकारात्मकता जास्त तयार होते, असा आरोप केला.

रणबीर कपूर ( Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana ) आणि बॉबी देओल स्टारर ‘अ‍ॅनिमल’ ( Animal,)चित्रपटात उपेंद्र लिमयेंनी एक छोटीशी भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावरही त्यांचा सीन व्हायरल झाला होत आगे. यावर लिमये म्हणाले, “सोशल मीडियावर बरेच मीम्स, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शेकडो लोकं सारख ते पाठवतायत. आपल्याकडच्या लोकांना खूप वेळ आहे. जे व्हिडीओ, मीम्स येतायत, ते बघून फक्त हसायचं.”

लिमयेंना विचारण्यात आले की, तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय नाहीयेत? तर तुम्हाला काय वाटतं? यावर ते म्हणाले, “मी सोशल मीडियावर सक्रिय नाहीये, याबाबत अजिबात खंत वाटतं नाहीये. हिंदीमध्ये काही भूमिकांचं कास्टिंग सोशल मीडियावरील फॉलोअर्स लाखो आहेत, याच्यावर होतं. तर अशा बसमध्ये मी कधी बसणारच नाही. सोशल मीडियावरील फॉलोअर्सवर जर मी अभिनेता बरा ठरणार असेल तर मी अभिनयाच दुकानाच बंद करायला पाहिजे.” (Marathi Actor Upendra Limaye Talk About Social Media Pps)

पुढे बोलताना ते म्हणाले की, “मला सोशल मीडियाविषयी राग अजिबात नाहीये. पण ते कसे वापरेल पाहिजे हे आपल्या समजत नाही. त्यामुळे नकारात्मकता जास्त वाढत आहे. मला ते झेपत नाही म्हणून मी थोडासा लांब राहतो.” लिमयेंच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण त्यांच्याशी सहमत आहेत तर काही जण त्यांचे मत बदलण्याचे आवाहन करत आहेत. (Upendra Limaye shared his opinion on viral memes videos on social media)

आधिक वाचा-
Shocking! प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली भीषण आग; घरात अडकलेली महिला गभीर जखमी तर…
Sankarshan Karhade: ‘मिसळ खाल्ली अन्..…’, संकर्षणची ‘ती’ पोस्ट पाहून नेटकरी म्हणाले, ‘भुतासारखा माणुस…’

हे देखील वाचा