Saturday, April 19, 2025
Home मराठी ‘दाखवणे बंद करा लोक बोलणे बंद करतील’, उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्या वादावर सुप्रिया सुळे यांचे मत

‘दाखवणे बंद करा लोक बोलणे बंद करतील’, उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्या वादावर सुप्रिया सुळे यांचे मत

मागील काही दिवसापासून सुरु असलेला अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. दोघींनीही अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकींवर आरोप करताना दिसत आहे. या दोघींच्या वादावर खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारला गेला, त्यांनी या प्रकरणावर त्यांचे मतं मांडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “अशावेळी मला कैलासवासी माजी अर्थमंत्री श्री. अरुण जेटली आठवतात. ते एकदा म्हणाले होते की तुम्ही दाखवणे बंद करा, लोक बोलणे बंद करतील. मी या प्रश्नांबाबत काल ही बारामतीत बोलले, त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांना विनम्र आवाहनही केले. आपल्या गलिच्छ राजकारणासाठी, कोणत्याही विषयासाठी महिलेविषयी कोणीही बोलू नये मी हात जोडून विनंती करते. महाराष्ट्राची परंपरा आहे की, सामाजिक परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होते, त्यामुळे या सर्वांचा विचार करून स्वतःला आवरले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्या कामाची सुरुवातही महाराष्ट्रातूनच झाली. जिजाऊंबाबत आपण अभिमानाने बोलतो त्याही महाराष्ट्रातीलच आहेत. त्यामुळे अशाविषयी प्रतिक्रिया विचारली की मी आधीपासूनच हीच विनंती करत आलेले आहे. मुळात मला जनतेने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिलेले आहे. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी आणि विजेचा तुटवडा हे प्रामुख्याने आव्हान आहेत. याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 चित्रा वाघ यांनी तर उर्फी जावेद विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. यासोबतच त्यांनी “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.” असा धमकीवजा इशारा देखील दिला आहे. उर्फीने देखील त्यांच्या प्रत्येक वक्तव्यांवर रोखठोख उत्तरं दिली.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘शार्क टँक इंडिया’ची जज आहे ‘एवढ्या’ कोटींची मालकीण; वर्षाकाठी कमावते पैसाच पैसा

‘अवतार 2’ने मारलं भारतीय बॉक्स ऑफिसचं मैदान, नुकत्याच हिट झालेल्या सिनेमाला पछाडत कमावले ‘एवढे’ कोटी

हे देखील वाचा