Saturday, March 15, 2025
Home अन्य ‘या’ गायकाला उर्फी जावेद करत आहेत डेट, सोशल मीडिया पोस्ट होतायेत जोरदार व्हायरल

‘या’ गायकाला उर्फी जावेद करत आहेत डेट, सोशल मीडिया पोस्ट होतायेत जोरदार व्हायरल

आपल्या वेगवेगळ्या ड्रेसने सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करणारी अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. परंतु आता ती तिच्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतेच ‘व्हॅलेंटाईन डे’चे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती एका इंडोनेशिया सिंगरसोबत दिसत आहे. उर्फीने देखील त्याच्यासोबत एक फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यामुळे आता तिचे चाहते असा अंदाज लावत आहेत की, उर्फी त्याच्यासोबत रिलेशनमध्ये आहे.

उर्फीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यातून तिने तिच्या चाहत्यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टवर सिंगर कुंवर याने कमेंट केली होती की, ‘हॅप्पी वी डे उर्फी जी.” (Urfi javed dating indonadian singer posted a photo with him)

तसेच त्याने देखील एक पोस्ट केली होती. त्यावर त्याने लिहिले होते की, “इथे खूप काही शिजत आहे. उर्फीने त्याच्या या पोस्टला रिपोस्ट केले होते. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आय नो यू लव्ह मी.” त्यामुळे आता तिचे चाहते तिला विचारता आहेत की, ते दोघे डेट करत आहेत का? कुंवर एक चांगला गायक आहे. त्याची गाणी त्याच्या चाहत्यांना देखील खूप आवडतात. त्याने अफसाना खान तसेच अनेक कलाकारांसोबत व्हिडिओ बनवले आहेत. तसेच तो लवकरच त्याचा नवीन प्रोजेक्ट लॉन्च करणार आहे.

उर्फीने कुंवरसोबत जो फोटो शेअर केला होता तो फोटो शेअर करून तिने लिहिले होते की, “तिथे ८ डिग्री एवढे तापमान होते, या ड्रेसमध्ये मला एका गाण्याची आठवण आली ‘तू जाने ना ‘परंतु सिंगर मी नाही कुंवर आहे.” तिची ही पोस्ट जोरदार व्हायरल झाली होती.

हेही वाचा :

हे देखील वाचा