इंटरनेट सेन्सेशन बनलेली टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्डनेस आणि हॉट ड्रेसिंग सेन्ससाठी चर्चेत असते. आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे उर्फीला सोशल मीडियावर ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते, परंतु उर्फी नेहमीच ट्रोलिंगचा सामना अगदी बिनधास्तपणे करते. मात्र यावेळी उर्फीने एका ट्रोलरवर कडक कारवाई करत, मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. उर्फीने स्वतःच्या इंस्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली आहे.
अनेकदा स्वत:बद्दल अपशब्द सहन करणाऱ्या उर्फीला साजिद चिप्पा नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने, तिचा राग अनावर झाला. हे सर्व वाचून उर्फीला राग सहन झाला नाही आणि तिने साजिदच्या मेसेजचा स्क्रीनशॉट आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला. ज्यामध्ये साजिद तिच्यासाठी अपशब्द वापरताना दिसत आहे. स्क्रीनशॉट शेअर करत उर्फीने लिहिले की, “तुम्ही माझ्यासाठी वापरत असलेल्या घाणेरड्या भाषेकडे मी सहसा दुर्लक्ष करते, पण हे अस्वीकार्य आहे.” (urfi javed files complaint against troller)
अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘धर्माच्या नावावर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध मी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. जो तमाम अतिरेकी लोकांसाठी धडा असेल. साजिद तुरुंगात आनंद घे.” यासोबतच उर्फीने मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे.
उदयपूर मर्डर केसवर उर्फीने दिली प्रतिक्रिया
उदयपूरच्या कन्हैयालाल मर्डर केसमुळे संपूर्ण देश संतापाच्या भरात असतानाच, इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेदनेही या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आपल्या इन्स्टा स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत उर्फीने लिहिले की, “आपण कुठे जात आहोत. द्वेष पसरवावा किंवा त्याच्या नावाने कोणाचीही हत्या करावी, असे अल्लाहने म्हटले नाही.”
बिग बॉस ओटीटी मधून मिळाली खरी ओळख
उर्फी जोपर्यंत मालिकांमध्ये दिसली होती तोपर्यंत तिची ओळख मर्यादित होती. कारण तरुण या मालिकांपासून दूर राहतात, परंतु जेव्हा ती बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये दिसली तेव्हा ती गणना करण्यासारखी शक्ती बनली. विशेषतः तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाईलची चर्चा होऊ लागली आणि आज ती स्टाईलिंग दिवा बनली आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा तिच्या स्टाईलबद्दल चर्चेत असते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा