Saturday, June 29, 2024

उर्फीचा बर्फी लूक! कपडे तर सोडाच, अभिनेत्रीनं शरीर झाकण्यासाठी लढवली भलतीच शक्कल

आपल्या असामान्य फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेद(Urfi Javed) हिला कोण ओळखत नाही. आपल्या अनोख्या ड्रेसेज आणि स्टाइलमुळे सोशल मीडियाची लीजेंड बनली आहे. उर्फी जावेद जेवढे प्रयोग क्वचितच इतर कोणत्याही सेलिब्रिटीने केले असतील. उर्फीचा प्रत्येक ड्रेस केवळ लोकांचे लक्ष वेधून घेत नाही तर तिच्या धैर्याचे उदाहरण देखील बनतो. कधी फुलांची पाने, कधी काच, कधी दगड तर कधी ब्लेडने स्वत:साठी ड्रेस बनवणाऱ्या उर्फीने यावेळी खात असलेल्या मिठाईलवर चांदीच्या पेपरवर्कमध्ये दिसली आहे. त्यानंतर लोक नेहमीप्रमाणेच त्याला ट्रोल करत आहेत.

अतरंगी पोशाख करत त्याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या उर्फी जावेदने पुन्हा एकदा हटके स्टाईल अंगप्रदर्शन केलं आहे. यावेळी, तिने शरीरावर कुठलाही कपडा परिधान केला नसून केवळ पेपर चिकटवला आहे. सोशल मीडियावर तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला असून काहींना तिला उर्फी नाही तर तू बर्फी आहेस, असे म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

सोशल मीडियावर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त फोटोशुटमुळे धुमाकूळ घालणाऱ्या उर्फी जावेदने एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, तिने अंगावर एकही कपडा परिधान केला नसून तिने शरीरावर चांदीचा पेपर चिकटवला आहे. विशेष म्हणजे तिचा हा लूक पाहून ती टॉपलेस झालीय, असं एकक्षण जाणवणार नाही. मात्र, फोटोचे नीट निरीक्षण केल्यास तिच्या अंगावर चांदीच्या पेपरवर्कने शरीर झाकल्याचे लक्षात येईल. कधी पोत्याने, कधी वर्तमानपत्राने, कधी दगडाने आपले शरीर झाकून चाह्त्यांसमोर येणाऱ्या उर्फीने आता चक्क चांदीच्या पेपरने आपले शरीर झाकले आहे. तिचा हा लूक इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आणि प्रचंड व्हायरल होत आहे. “इल्यूमिनेटिंग, यासाठी मी चांदीच्या पेपर वर्कचा वापर केला आहे, असे कॅप्शन उर्फीने दिले आहे.

दरम्यान, यापूर्वीही उर्फीने सोशल मीडियावर एक बोल्ड पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने सांगितले की, पंजाबी सिनेक्षेत्रातील एक व्यक्ती तिचा विनयभंग करून त्रास देत आहे. या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करून त्याला अटक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. उर्फीचा विनयभंग करणाऱ्या या व्यक्तीचे नाव ओबेद आफ्रिदी आहे. तो पंजाबी सिने इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
तुफान वादळात अडकली सारा अली खान, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
‘शाहरुख, तू शेवटचा सुपरस्टार नाही…’, विजय देवरकोंडाने का केले खळबळजनक वक्तव्य?
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचं रॉयल फोटोशूट, लूक पाहून नेटकरी फिदा

हे देखील वाचा