Saturday, June 29, 2024

असे काय झाले की, सोशल मीडियावर व्यक्त होतीये उर्फीच्या मरणाची इच्छा

बिग बॉस ओटीटीचा भाग असलेली उर्फी जावेद (urfi javed)दररोज चर्चेत असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. कपड्यांबद्दल ट्रोल व्हायला ठीक होतं, पण यावेळी ट्रोलने मर्यादा ओलांडून उर्फीचा मृत्यू व्हावा यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ट्रोल्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आता ट्रोल त्याच गोष्टीवरून उर्फीला लक्ष्य करत आहेत आणि तिच्या पोस्टवर अश्लील कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “मूसेवाला ऐवजी ही गेली पाहिजे होती.” तर दुसऱ्याने लिहिले, “सिद्धूला लागलेली गोळी तुला लागायला पाहिजे होती.”

हे स्क्रीनशॉट शेअर करत उर्फी जावेदने लिहिले की, “गेल्या काही दिवसांत मला आलेल्या काही कमेंट मी शेअर करत आहे. लोक माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना करत आहेत की कोणीतरी मला गोळी मारली असती. आपण एका क्रूर जगात राहतो, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की, तुम्ही माझ्या मृत्यूसाठी अधिक प्रार्थना करा कारण मी इथे जगण्यासाठी आले आहे.”

याशिवाय दुसरा स्क्रीनशॉट शेअर करताना उर्फीने लिहिले की, “मी कोणाच्याही हत्येशी संबंधित नाही (देव मृतांच्या आत्म्याला शांती देवो). पण ज्याप्रकारे लोक माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना करत आहेत, ते मला घाबरवते. जेव्हा उर्फीला पापाराझींनी विमानतळावरील ट्रोल्सबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, “लोकांना मला मारले जावे असे वाटते, तर मी कोणाशीही काही केले नाही. बाकी ठीक आहे पण अशा कमेंट्स बघून वाईट वाटते.”
अशाप्रकारे तिने देखील सडेतोड उत्तर दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा