Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

फॅशन सेन्ससोबत, वैयक्तिक आयुष्यातील खुलासे आणि हिंदू मुस्लिमांवर वक्तव्य ‘हे’ आहेत उर्फी जावेदचे गाजलेले विवाद

टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात जास्त विवादित अभिनेत्री म्हणून पहिले नाव येते ते उर्फी जावेद. आपल्या कामापेक्षा आधी उर्फी तिच्या अतरंगी फॅशनमुळे खूपच लाईमलाइट मिळवते. तिला तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. मात्र कधी कधी उर्फी तिच्या कपड्यांपेक्षा अधिक तिच्या विवादित व्यक्तव्यांमुळे देखील वादात अडकताना दिसते. तिच्या अशा वक्तव्यांवरून तिला सोशल मीडियावर नेटकरी खूपच सुनवताना दिसतात. हिंदू मुस्लिम यांच्यावर दिलेले वक्तव्य असो किंवा खासगी जीवनातील खुलासे असो, उर्फीची व्यक्तव्य तिला गाजवताना दिसतातच. जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही विवाद.

एकदा उर्फीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक खुलासा करत सर्वाना धक्काच दिला होता. ती ११ मध्ये शिकत असताना तिचे फोटो अडल्ट साईटवर टाकण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे नातेवाईक तिला पॉर्नस्टार समजत होते. एवढेच नाही तर तिचे बँक अकाऊंट देखील चेक केले जायचे. यामुळे तिला तिचे वडील मानसिक आणि शारीरिक त्रास देखील द्यायचे. यामुळेच तिला घरातून पाळावे लागले.

उर्फीने एकदा तिला करण्यात येणाऱ्या ट्रोलिंगवरून सांगितले होते की, त्यांच्या समुदायातील सर्व महिलांना त्यांना ताब्यात ठेवायचे आहे. यासाठीच ती इस्लामला मानत नाही. पुढे ती असे देखील म्हणाली होती की, तिला ट्रोल करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ती तसे वागत नाही जसे धर्मानुसार सांगितले आहे आणि तिच्याकडून अपेक्षित आहे. ती तर मुस्लिम मुलासोबत लग्न देखील करणार नाही. तिचा इस्लामवर विश्वास नसून ती कोणताच धर्म फॉलो करत नाही.

इस्लामववर बोलताना तिने हे देखील सांगितले की, तिला भगवद गीता वाचत आहे. यावरून सुद्धा तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले. यासर्व ट्रोलिंगवर तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमधून स्पष्टीकरण दिले होते. ती यात सांगितले होते की, ती सर्व जाती आणि धर्माची आहे. जर तुम्ही हिंदू असून हिंदू लोकांचा तिरस्कार करतात तर ती हिंदू आहे. मुस्लिम असून, मुस्लिमांचा तिरस्कार करतात तर ती मुस्लिम आहे. जर तुम्ही दलित लोकांचा तिरस्कार करतात तर ती दलित आहे. यावरून तर तिला अजूनही ट्रोल केले जाते. काही दिवसांपूर्वी तिने ईद मुबारकची पोस्ट टाकल्यानंतर तिला त्यावरून देखील ट्रोल केले गेले.

एकदा सुजेन खानची बहीण असलेल्या फारच खानने कमेंट करत उर्फीच्या फॅशन सेन्सला सर्वात खर्व म्हटले होते. यानंतर उर्फीने एक व्हिडिओ शेअर करत याला उत्तर सुद्धा दिले होते. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले होते की, “जेव्हा फालतू काकू इंस्टाग्रामवर कमेंट करते की माझी टेस्ट खर्व आहे. मजा आली का तुम्हाला? (माझी इन्स्टा स्टोरी पहा हे समजून घेण्यासाठी).” यातच अभिनेत्री कश्मिरा शाह देखील मध्ये पडली आणि म्हणाली, “असे लोकं फक्त इंस्टाग्रामवरच प्रसिद्ध आहेत.” यावर उर्फी म्हणाली होती की, “मी इंस्टाग्रामवर फेमस आहे खरी आयुष्यात नाही. मात्र तू दोन्ही ठिकाणी फेमस नाही.” यानंतर हा वाद खूपच वाढला होता. काश्मिराने उर्फीला अशिक्षित देखील म्हटले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा