‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद(Urfi Javed) सिनेसृष्टीत तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या आवडत्या पोशाखांनी नेटिझन्सला आकर्षित करते. ती अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. उर्फी अनेकदा तिच्या आउटफिट्स आणि बोल्डनेसमुळे होत असलेल्या टीकेमधून खचून जात नाही आणि ती आपले जीवन जगत आहे. यादरम्यान, उर्फीच्या कमाईवर अनेकवेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत. चला तर जाणून घेऊया तिच्या नेटवर्थ आणि कार कलेक्शनबद्दल…
उर्फी जावेदला आजच्या काळात सर्वजण बोल्डनेसमुळे ओळखतात पण या अभिनेत्रीने डझनभराहून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे. ती ‘दुर्गा’, ‘सात फेरे की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली आहे. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. पण तिला लोकांमध्ये फक्त ‘बिग बॉस’ मधूनच प्रसिद्ध मिळाली आहे. उर्फीचे फाेटाे साेशल मीडियावर येताच माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत असतात.
कोटींची मालमत्ता
प्रत्येकवेळी उर्फी जावेदच्या मालमत्तेबद्दल प्रश्न उपस्थित होतो, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उर्फी करोडोंच्या संपत्तीची मालकिन आहे आणि ती दर महिन्याला लाखोंमध्ये कमावते. एका रिपोर्टनुसार, उर्फी मालिकेच्या एका एपिसोडसाठी 25 ते 30 हजार रुपये घेते आणि ती दरमहा 30 लाख रुपये कमवते. त्यांची एकूण संपत्ती 172 कोटी इतकी आहे.
घर आणि कार संग्रह
उर्फीचा जन्म लखनऊमध्ये झाला होता पण आता ती मुंबईत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहते. तिच्याकडे जीप कंपास एसयूव्ही आहे, ज्याची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. उर्फी या कारसोबत अनेकदा स्पॉट केली जाते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उर्वशी रौतेला पोहोचली ऑस्ट्रेलियाला; नेटकरी म्हणाले, ‘ऋषभ पंतचा पाठलाग…’
प्रयाेग करावे, तरी किती! केसरिया गाण्याचं भाेजपुरी व्हर्जन रिलीज; चाहते म्हणाले, “केसरिया कधीच…