‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या फॅशन आणि स्टाइल सेन्ससाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या आवडत्या पोशाखांनी नेटिझन्सला आकर्षित करते. ती अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. उर्फी काेणत्याही वस्तूपासून बनवलेला ड्रेस घालू शकते. ब्लेड, सिमकार्ड, पॉलिथिन अशा सर्व गोष्टींनी बनवलेले कपडे उर्फी परिधान करते. अलीकडेच तिने फाेटाे शेअर केले आहे, पण यावेळी उर्फीचे फोटो पाहता तिने काहीही परिधान केलेले नाही असे दिसत आहे. उर्फीचे हे फाेटाे साेशल मीडियावर येताच माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.
आपल्या अनोख्या पेहेराव्याने सर्वांना थक्क करणाऱ्या उर्फी(Urfi Javed) हिने पुन्हा एकदा आपल्या बाेल्ड लूकने चाहत्याना आश्चर्य चकित केलं आहे. उर्फीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिचे बाेल्ड फाेटाे शेअर केले आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहु शकता की, उर्फी कपड्यांशिवाय दिसत आहे. फाेटाेमध्ये तुम्ही पाहू शकता की,उर्फीचे पिवळ्या रंगाच्या दोन तुकड्यांमध्ये क्लिक केलेली फाेटाे गोंधळात टाकणारी आहेत. या फाेटाेंमध्ये उर्फी काचेचा तुकडा हातात धरून दिसत आहे. हे फाेटाे पोस्ट करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला माहित नाही !! मला विचारू नका! ”
युजरने केलं उर्फी जावेदला ट्राेल
उर्फीचे हे फोटो पाहून काेणी तिला ट्रोल करत आहे, तर कोणी आश्चर्यचकित होऊन अभिनेत्रीला ‘अल्टीमेट दिवा’ असे म्हणत आहे. त्याच वेळी, एका सोशल मीडिया युजरने लिहिले, “ब्रो, हि जीनियस आहे, हे काय आहे हे समजण्यासाठी मला 10 सेकंद लागले.”
View this post on Instagram
याआधी उर्फी ब्रॅलेटमध्ये एअरपोर्टवर पोहोचली होती. तिच्या त्या बाेल्ड लूकवर युजरने तिला खूप ट्रोल देखील केले हाेते. इतकेच नाही तर त्याआधी उर्फीने तिचा आउटफिट आरशांनी तयार केला होता. या आउटफिटमध्ये उर्फीने तिच्या छातीवर आणि चेहऱ्यावर आरसे चिकटवले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अगं जरा दमानं! राखीला बनायचंय मुख्यमंत्री; म्हणाली, ‘मला मुंबईतले रस्ते हेमा मालिनींच्या कंबरेसारखे…’
अरुण बाली यांच्या निधनाने पूर्णपणे तुटली नीना गुप्ता; भावूक पाेस्ट चर्चेत