Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

नाद करा पण माझा कुठं! उर्फीच नवीन गाणं रिलीज; चाहते म्हणाले, ‘स्टार किड्स…’

‘बिग बॉस ’ फेम उर्फी जावेद सिनेसृष्टीत तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या आवडत्या पोशाखांनी नेटिझन्सला आकर्षित करते. ती अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. अशातच उर्फी पुन्हा एकदा एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसली असून तिचे ‘आये ही ये मजबूरी’ हे गाणे रिलीज झाले आहे. पावसात भिजलेली उर्फीची तरुणाई या गाण्यात कहर करत आहे. विशेष म्हणजे उर्फीला तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ट्रोल करणारे आता या गाण्यात तिची प्रशंसा करताना दिसत आहेत.

‘आये ही ये मजबूरी’ या हिट गाण्याचे रिमिक्स
उर्फी (urfi javed) हिचे हे नवीन गाणं मूळ गाणं नसून झीनत अमानच्या ‘आये ही ये मजबूरी’ या हिट गाण्याचे रिमिक्स आहे, जे उर्फी जावेदने नव्या पद्धतीने सादर केले आहे. पावसात चित्रित केलेले हे गाणे खूपच हॉट आणि सेक्सी आहे कारण उर्फीने या गाण्यात तिच्या स्टाईलने सर्वांचे होश उडवले आहेत. लाल साडी नेसल्यामुळे उर्फीने जो कहर केला आहे ते पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहे.

उर्फी जावेदचे हे गाणं पाहिल्यानंतर तिचे चाहते यूट्यूबवर मजेशीर कमेंट करत आहेत. लोकांनाही उर्फीची ही शैली आवडली असल्याने ते उरफीचे कौतुक करत थकत नाही आहेत. कमेंट करून चाहते तिची तुलना स्टार किड्सशी करत आहेत, तर काहींनी तिला स्टार किड्सपेक्षा चांगले म्हंटले आहे.

उर्फी जावेद गेल्या वर्षी बिग बॉसमध्ये दिसली होती, त्यानंतर तिची लोकप्रियता अशी वाढली की, उर्फी कायमच चर्चेत असते. उर्फीच्या नावाची चर्चा होत नसेल असा क्वचितच एखादा दिवस गेला असेल. अशातच बर्‍याच दिवसांनी उर्फी एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसल्याने चाहते व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! उर्वशीच्या मागणीत सिंदूर अन् गळ्यात मंगळसूत्र; युजर म्हणाले,’मानसिक आरोग्य…’
मराठी माणुस! साेप्पा नव्हता शिवचा प्रवास करिअरच्या सुरुवातीला विकायचा दुध अन् न्युज पेपर

हे देखील वाचा