बॉलिवूड जगतात अशा अनेक अभिनेत्री आणि मॉडेल आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. यामध्ये सर्वप्रथम नाव घेतले जाते ते म्हणजे अतरंगी जीव उर्फी जावेदचे. आजपर्यंत उर्फी जावेदच्या (Urfi Javed) अतरंगी कपड्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. एकापेक्षा एक चित्र- विचित्र ड्रेस घालत उर्फीने माध्यमांमध्ये चर्चेत राहण्याचा जोरदार प्रयत्न केला. आता उर्फी तिच्या केसांच्या स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. सध्या उर्फीचे असेच काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिच्या केसांच्या अतरंगी स्टाईलने सर्वांनाच चकित केले आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
‘बिग बॉस ओटीटी’पासून उर्फी जावेद हे नाव चांगलेच चर्चेत आले होते. तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळेच ती वर्षाचे ३६५ दिवस चर्चेत असते. तिच्या अफलातून फॅशन सेन्समुळे ती सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. आता तिच्या केसाच्या आगळ्यावेगळ्या स्टाईलची सर्वत्र चर्चा रंगली आहे. उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने केसांची नवीनच स्टाईल केलेली दिसत आहे. तिने तिच्या केसांवर असंख्य क्लिपा लावलेल्या दिसत आहेत आणि त्यावर पांढरा रंग लावलेला दिसत आहे. त्यामुळे तिची ही स्टाईल खूपच भन्नाट वाटत आहे. सध्या तिच्या या विचित्र हेअर स्टाईलची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
या व्हायरल फोटोमध्ये तिने क्रॉप टॉप घातला आहे. त्यामुळे काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. या फोटोवर जोरदार प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अनेकांनी तिच्या या स्टाईलमुळे उर्फीला जोरदार ट्रोल केले आहे. याआधीही अनेकदा तिच्या अशा अतरंगी ड्रेसने नेटकऱ्यांना डोक्याला हात लावायला लावला होता. उर्फीने ‘बडे भैय्या की दुल्हनियां’, ‘दुर्गा’, ‘बेपनाह’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिच्या या अभिनयापेक्षा ती अशा अतरंगी स्टाईलमुळेच सदैव नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत असते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-