उर्फी जावेद (Urfi Javed) बिग बाॅस ओटीटीमुळे चांगलीच चर्चेत आली होती. ती तिच्या बोल्ड फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते . परंतु यामुळे, ती अनेकदा ट्रोलही होते. पण या ट्रोल्सचा तिच्यावर कधीही परिणाम होत नाही. ती बऱ्याचवेळा ट्रोलर्सना निर्भीडपणे उत्तरं देत असते. असेच काही तिने या वेळीही केले आहे.
View this post on Instagram
तिने ट्रोलला दिलेल्या प्रत्युत्तराचा स्क्रीनशाॅट सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका युजरने राखी सावंतसोबत उर्फीची तुलना करत लिहिले होते की, “उर्फीच पुढची राखी आहे.” यावर उत्तर देत उर्फीने लिहिले आहे की, “आय ऍम द फस्ट उर्फी.”
यापुढे तिने एका नोटमध्ये लिहिले आहे की, “तुम्हाला काही परदेशी ब्रॅंड माहित आहेत, तुम्ही तुमच्या फोटोंना व्हिंटेज फिल्टर लावता, तुम्हाला वाटतं की, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि माझा अपमान करू शकता. राखी एक लिजेंड आहे. राखी सावंतसोबत माझी तुलना करून तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही माझा अपमान करताय, तर त्यातून तुमचीच पातळी लक्षात येत आहे.”
View this post on Instagram
एकीकडे उर्फी तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोल होत असली, तरीही तिच्या चाहत्यांना तिची ही स्टाईल खूपच आवडते.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)