बिग बॉस ओटीटीची स्पर्धक असणारी अभिनेत्री उर्फी जावेद सतत तिच्या फॅशन सेन्समुळे आणि तिच्या विचित्र कपड्यांमुळे मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर प्रकाशझोतात आहे. तिला तिच्या अतिशय हटके आणि ऑड फॅशनसेन्समुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जात आहे. तिचा फॅशन सेन्स आणि कपड्यांची स्टाईल लोकांना काय कलाकारांना देखील समजत नसेल मात्र तरीही ती तिला आवडेल तेच करते, आणि याच गोष्टीतून ती लाइमलाईट्मधे येते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी उर्फी सतत स्वतःचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.
आता तर उर्फीचे फॅन्स देखील तिच्या वेगवेगळ्या लूकसाठी नेहमीच उत्सुक दिसतात. बोल्ड व्यक्तिमत्व आणि हटके फॅशनने तिला मिळवून दिलेली प्रसिद्धी बिग बॉसच्या प्रसिद्धीला देखील मागे टाकून गेली. पुन्हा एकदा उर्फीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आणि पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
उर्फीने सोशल मीडियावर नुकताच तिचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला असून, यातही तिचा हटके फॅशनसेन्स फॅन्सला आणि नेटकऱ्यांना पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने एक पिवळ्या रंगाचा शर्ट उलटा घातला असून, मागच्या बाजूला फक्त शर्टाचे एकाच बटन लावलेले दिसत आहे. बाकीचे सर्व बटन खुले सोडलेले दिसत आहे. याशिवाय तिने तिचे केस कुरळे केले असून, त्यावर पिवळ्या रंगाचे फुल लावलेले देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी खूपच खुश आणि आनंदी दिसत असून, तिचा हा लूक फॅन्सला चांगलाच आवडत आहे. तर काही नेटकरी तिच्या अशा फॅशनमुळे तिला ट्रोल करताना दिसत आहे. तिला ट्रोल करताना एकाने लिहिले, “एवढी मोठी झाली तरी अजून शर्ट घालता येत नाही.”
याआधी देखील उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक बोल्ड लूक असलेला व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तिने काळ्या रंगाचा हायनेक कुर्ता घातला होता जो एका बाजूने फाटलेला होता. या ड्रेसमुळे देखील तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते.
हेही वाचा :
विकी कौशलने साली इसाबेल कैफला दिल्या अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा
अक्षय खन्नासोबत डेब्यू करणार होती बिपाशा, लग्नाआधी केले ‘या’ ३ अभिनेत्यांना डेट