Monday, July 1, 2024

धक्कादायक! उर्फी जावेदने केली आत्महत्या? उदयपुर घटनेचा निषेध केल्यानंतर बातमी होतेय व्हायरल

उर्फी जावेद (Urfi Javed) दररोज नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत येत असते. आपल्या हटके स्टाईलने   लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारी आणि नेहमी चेहऱ्यावर मिलियन डॉलरचे स्मित घेऊन फिरणारी उर्फी सध्या चांगलीच संतापलेली दिसत आहे. आणि त्याचे कारणही तसेच आहे.  ज्याबद्दल तिने स्वतः सोशल मीडियावर चर्चा केली आहे. तिच्या आत्महत्येची खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, त्यानंतर ‘उर्फी जावेदने आत्महत्या केली आहे’ या बातमीने मनोरंजन जगतात जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर आता संतापलेल्या उर्फीने प्रतिक्रिया दिली आहे.

जिथे उर्फी जावेदची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. त्याचवेळी तिच्या स्टाइल आणि स्टेटमेंटमुळे अनेकदा तिला ट्रोलही केले जाते. . अलीकडेच उर्फी जावेदने उदयपूरमधील कन्हैयालाल हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध केला, त्यानंतर तिला सोशल मीडियावर अनेक धमक्या मिळाल्या होत्या. पण आता एक धक्कादायक बातमी समोर आली असून काही लोक अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या खोट्या पोस्ट शेअर करून खोट्या बातम्या पसरवत आहेत. उर्फी जावेदने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Urfi Javed
Photo Courtesy: Instagram/ urf7i

उर्फी जावेदने इंस्टा स्टोरीमध्ये एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने 2 फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. एकामध्ये उर्फीच्या गळ्यात दोरी बांधलेली दिसत आहे. कैलाश राज नावाच्या युजरने हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की, ‘RIP उर्फ ​​जावेद, हे कोणाचेही मोठे नुकसान नाही.’ युजरने फोटोवर जन्म आणि मृत्यू वर्ष – 1997 ते 2022 देखील नमूद केले आहेत. याशिवाय, त्या व्यक्तीने कमेंटमध्ये ‘मी उर्फीच्या मारेकऱ्याच्या पाठीशी उभा आहे,’ असेही लिहले आहे.  या सगळ्या प्रकरणावर उर्फी जावेदने प्रतिक्रिया देताना “या जगात काय चालले आहे? मला जीवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्या आहेत आणि आता हे. मी माझ्या मारेकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचेही त्याने कमेंटमध्ये म्हटले आहे. मूर्ख, “अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.

 

हे देखील वाचा