बीग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आणि सोशल मीडिया इनफ्लुएंसर उर्फी जावेद आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशन स्टाइलने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. कच, पोते, दगडी, गाडीची चैन, वायर अशा अनेक वस्तूंपासून फॅशनेबल कपडे परिधान करुन तिने अनेकांचे लक्ष वेधले आहे. मात्र, उर्फीला तिच्या विचित्र फॅशेनमुळे अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. उर्फीच्या कपड्यांमुळे ती समाजामध्ये न्युडीटी परवत आहे असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्याशिवा त्यांनी उर्फीच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रारही नोंदवली आहे.
गेल्या अनेक दिवसांपसून उर्फी जावेद (Urfi Javed) आणि अभिनेत्री चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये सोशल मीडिया वॉर पाहायाला मिळत आहे. आता मात्र, चित्रा वाघ यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिस आयुक्तालयाने उर्फीला (दि, 14 जानेवारी) रोजी चौकशीदरम्यान बोलवले होते. नग्नता तसेच अश्लीलतेचा प्रचार करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी उर्फीवर केला होता. नुकतंच उर्फीने अंबोली पोलीस ठाण्यात येऊन स्वतःचा जबाब नोंदवला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार चौकशीदकरम्यान उर्फीने तिची बाजू मांडत पोसिल आयुक्तालयाला जबाब दिला आहे. उर्फी म्हणाली की, “मी एक भारतीय आहे, मला माझ्या आवडीचे कपडे परिधान करायचा पूर्ण अधिकार आहे. भारताच्या राज्यघटनेने मला हा अधिकार दिला आहे. शिवाय मी माझ्या कामाच्या अनुषंगाने हे कपडे परिधान करते. त्यावरून माझं फोटोशूट होतं, कधीकधी कामाच्या गडबडीत मला कपडे बदलायला वेळ मिळत नाही तेव्हाच फोटोग्राफर बाहेर येऊन फोटोज काढतात आणि ते व्हायरल होतात. आता हे व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवणार?”
View this post on Instagram
उर्फीने तिच्यावर पडलेल्या चौकशीचा उलट प्रश्न विचारला असून याचा जबाब मागितला आहे. यावर असे दिसून येत आहे आता हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असून राजकीय मुद्दा बनला आहे. त्याशिवाय उर्फीने देखिल चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. उर्फीच्या अशा वक्तव्यानंतर चित्रा वाघ काय प्रतिउत्तर देतिल हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ही दोस्ती तुटायची नाय! छोटा भाईजान घराबाहेर पडताच ढसा ढसा रडला शिव ठाकरे
विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत बीचवर दिसला शर्टलेस, पाहा व्हायरल फाेटाे