Sunday, October 6, 2024
Home अन्य ‘फटाके फोडू नका, तर स्वतः एक फटाका बना’, उर्फी जावेदने दिवाळी लूक शेअर करून दिला खास मेसेज

‘फटाके फोडू नका, तर स्वतः एक फटाका बना’, उर्फी जावेदने दिवाळी लूक शेअर करून दिला खास मेसेज

दिवाळी निमित्त अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांचे खास फोटो शेअर करत आहेत, तसेच चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर तिचा दिवाळी लूक शेअर करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. उर्फी जावेद ही तिच्या फॅशन सेन्समुळे खूप चर्चेत असते. अशातच तिने दिवाळीमध्ये साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. तिचा दिवाळीतील हा अंदाज चाहत्यांना आवडला आहे.

उर्फीने सोशल मीडियावर तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, उर्फीने केशरी रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज घातला आहे. तसेच तिने सगळे केस मागे बांधून कानात ईअरिंग घातले आहे. या लूकमध्ये ती सिंपल दिसत आहे. (Urfi Javed share her diwali look photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझ्या प्रियजणांना दिवाळीच्या शुभेच्छा, फटाके फोडू नका तर स्वतः एक फटाका बना.” तिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा दिवाळी लूक आवडला आहे. महत्वाचे म्हणजे तिला यावेळी ट्रोल केले गेले नाही. तिच्या या फोटोला ६६ हजारपेक्षाही जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच कमेंट्सद्वारे तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

‘बिग बॉस ओटीटी’मधून प्रसिद्ध झालेली उर्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे बोल्ड फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. परंतु तिला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. ती या सगळ्यांकडे अजिबात लक्ष देत नाही. ‘बिग बॉस’मध्ये ती खास कमाल करू शकली नाही, परंतु तिला चांगली लोकप्रियता मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा