Friday, August 8, 2025
Home अन्य उर्फी जावेदसोबत सेल्फी घेणारा ‘तो’ गुटखा लव्हर! फॅन नसून, आहे भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठा कॉमेडियन

उर्फी जावेदसोबत सेल्फी घेणारा ‘तो’ गुटखा लव्हर! फॅन नसून, आहे भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठा कॉमेडियन

बिग बॉस ओटीटीमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi javed) सतत तिच्या फॅशनमुळे मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर गाजताना दिसत असते. उर्फीचे अतरंगी कपडे आणि तिची जरा हटके फॅशन नेहमीच चर्चेचा विषय असते. उर्फीला अनेकदा तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. मात्र तरीही ती सर्वांकडे दुर्लक्ष करत तिला हवे तसेच राहत असते. नुकताच उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यात उर्फीसोबत तिचा फॅन सेल्फी घेण्यासाठी त्याच्या तोंडात असलेला गुटखा तिथेच थुंकतो आणि सेल्फी घेतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीला उर्फी जावेदच्या गुटखा लव्हर फॅन (Urfi javed gutkha lover fan) म्हणून म्हटले जात आहे. या व्यक्तीला व्हिडिओनंतर खूप ट्रॉल केले गेले, मात्र हा व्यक्ती साधा व्यक्ती नसून, त्याचे भोजपुरी इंडस्ट्रीसोबत आणि ‘आश्रम’ वेबसिरीजशी देखील जवळचा संबंध आहे.

उर्फी जावेदसोबत सेल्फी घेणारा व्यक्ती हा भोजपुरी अभिनेता आणि कॉमेडियन संजय वर्मा (Sanjay Verma) असून तो भोजपुरी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका करत सर्वांना हसवण्याचा काम करताना दिसतो. त्याने भोजपुरी इंडस्ट्रीमधील पवन सिंग (Pawan Singh), खेसारी लाल यादव (khesari lal yadav), दिनेश लाल यादव निरहुआ (Dinesh lal yadav Nirahua), अरविंद अकेला कल्लू (Arvind Akela kallu) आदी सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले आहे. त्याने ‘पवन पुत्र’, ‘भाग खेसारी भाग’ आदी चित्रपटांमधून लोकांना तुफान हसवले असून, प्रेक्षकांना देखील त्याची कॉमेडी खूप आवडताना दिसते.

एवढेच नाही तर अभिनेता संजय वर्माने भोजपुरी अभिनेत्री असलेल्या अक्षरा सिंगवर (Akshara Singh) अनेक मोठे आणि गंभीर आरोप एका मुलाखतीदरम्यान लावले होते. त्याने सांगितले होते की, अक्षरा सिंगमुळे त्याला इंडस्ट्रीमध्ये जवळपास दोन वर्ष काम मिळाले नाही. जेव्हा अक्षरा आणि पवन सिंग रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा ती संजयला पवनला भेटू देखील देत नव्हती. अक्षरा आणि पवन यांच्यात वाद झाल्यानंतर त्याने पवनला चांगला व्यक्ती म्हणत अक्षराने लावलेले आरोप चुकीचे देखील सांगितले होते.

भोजपुरी अभिनेता असलेला संजय वर्मा चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. रोजच तो त्याचे सोशल मीडिया अपडेट करताना दिसतो. संजय वर्माने ‘आश्रम’ या सुपरहिट वेबसिरीजच्या तिन्ही भागात काम केले आहे. याशिवाय तो ‘रक्तांचल 2’ या सिरीजमध्ये देखील झळकला होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा