Monday, July 1, 2024

एकेकाळी ‘या’ दिग्दर्शकासोबत जोडले गेले होते उर्मिलाचे नाव, नंतर काश्मिरी मुलासोबत केले गुपचूप लग्न

‘रंगीला गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली उर्मिला मातोंडकर शनिवारी (4 फेब्रुवारी)ला आपला 44 वाढदिवस साजरा करत आहे. उर्मिला मातोंडकर हिने हिंदी चित्रपटांसोबतच मराठी, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही तिची क्षमता दाखविली आहे. चित्रपटांसोबतच उर्मिला मातोंडकर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी बर्‍याचदा चर्चेत राहिलेली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही तुम्हाला या अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.

उर्मिला मातोंडकरने सन 1980 मध्ये मराठी चित्रपट ‘झाकोळ’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 1981 मध्ये आलेला ‘कलयुग’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. परंतु त्यांना खरी ओळख 1983 च्या ‘मासूम’ या चित्रपटातून मिळाली. यानंतर बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

बालकलाकारानंतर सन 1989 मध्ये उर्मिला मातोंडकर ‘चाणक्य’ चित्रपटात प्रथमच मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली. त्याचवेळी उर्मिलाने सन 1991 मध्ये ‘नरसिम्हा’ या हिंदी चित्रपटात काम केले. यानंतर, उर्मिलाने बॉलिवूडला बरीच हिट फिल्में दिली ज्यात ‘रंगीला’, ‘जुदाई’, ‘सत्या’, ‘कौन’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘भूत’ आणि ‘एक हसीना थी’ या चित्रपटांचा समावेश होता. सन 1995 मध्ये रंगीला या चित्रपटासाठी उर्मिलाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. दुसरीकडे ‘तहजीब’, ‘पिंजर’, ‘नैना’, ‘मैंने गांधी को नहीं मारा’, ‘बस एक पल’ इत्यादी ऑफ बीट सिनेमातून उर्मिलाने प्रेक्षकांची मने जिंकली.

सन 2016 मध्ये उर्मिलाने मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले. उर्मिलाने तिचे लग्न मीडिया व तिच्या चाहत्यांपासून लपून ठेवले होते. उर्मिलाचा पती मोहसीन हा तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, उर्मिला आणि मोहसीन यांची भेट त्यांचा सामान्य मित्र मनीष मल्होत्रा ​​यांच्यामार्फत झाली होती. मोहसीन अख्तर मीर काश्मीरचा व्यापारी आणि मॉडेल असून त्याचा कपड्यांचा व्यवसाय आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी झोया अख्तरच्या ‘लक बाय चान्स’ या चित्रपटातही काम केले आहे.

मोहसीन आणि मनीष मल्होत्रा ​हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सन 2007 च्या मिस्टर इंडिया स्पर्धेमध्ये मोहसिन द्वितीय उपविजेता होता. इतकेच नाही तर मोहसिनने मनीष मल्होत्राच्या बर्‍याच शोमध्ये मॉडेलिंग देखील केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, एकेकाळी उर्मिलाचे नाव दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याशीही जोडले गेले होते, तथापि याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत विधान आले नाही. अशा परिस्थितीत या अहवालांच्या सत्यतेबद्दल काहीही सांगणे कठीण आहे.(urmila matondkar birthday know about bollywood rangeela girl personal and professional life)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
धक्कादायक! दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार असणाऱ्या नयनताराने देखील घेतला होता कास्टिंग काऊचचा विदारक अनुभव

लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुखचा नाशिक-मुंबई हायवेवर अपघात, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

हे देखील वाचा