बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर(Urmila Matondkar) हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ती अभिनय विश्वात पुनरागमन करत आहे. उर्मिला लवकरच ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. सौरभ वर्मा दिग्दर्शित तिवारी या थ्रिलर वेब सीरिजमध्ये ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ब सीरिजमध्ये छोट्या शहरात एका मुलची आणि आईची भावुक कथा दाखवली आहे. सीरिजमधील कथानक एका छोट्या शहरातील आहे.
नुकताचं तिवारी वेबसीरिजचा पहिला पोस्टर समोर आले आहे. त्यात उर्मिला जखमी अवस्थेत दाखवली असून ती आक्रमक दिसत आहे. तिचा लुक खूपच इंप्रेसिव्ह दिसत आहे. तिचा लूक खूपच प्रभावी आहे आणि पोस्टर पाहून हे स्पष्ट होते की ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. यावेळी शेवटपर्यंत उभी राहणारी व्यक्ती ही महिला असणार आहे, असं म्हणत तिने उर्मिलाने हे पोस्टर शेअर केले आहे.
View this post on Instagram
उर्मिलाने ‘सत्या’, ‘एक हसीना थी’, ‘भूत’, ‘रंगीला’, ‘कौन’ यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. सिनेइंडस्ट्रीमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिला फिल्म इंडस्ट्रीत ‘रंगीला गर्ल’ म्हणूनही ओळखले जाते. सध्या उर्मिला एक टीव्ही शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. अभिनेत्रीने ‘तिवारी’च्या प्रवासात सर्वांनी केलेल्या सहकार्याबाबत आभार मानले आहेत.
उर्मिलानं घेतलं सहा महिन्यांचं कठोर परीश्रम
निर्मात्यांनी सोमवारी ‘तिवारी’ चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टरवरील उर्मिलाचे हे रूपांतर पाहून चाहते नक्कीच आश्चर्यचकित झाले आहेत. उर्मिला या वेबसीरिजमध्ये ऍक्शन करताना दिसणार आहे. त्यासाठी तिने सहा महिने कठोर परिश्रम घेतले आहे. तिवारी सीरिजच्या निमित्ताने उर्मिलाने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘वेब सीरिजचे पात्र तिला आवडले. हे पात्र आई-मुलीच्या नात्यावर आधारीत आहे. त्याबरोबर या सीरिजमध्ये आणखी बरंच काही आहे. ऍक्शन, ड्रामा आणि कथानकात येणारे ट्विस्ट देखील आहेत.’ हे पोस्टर पाहून उर्मिलाचे चाहते ती पाहण्यासाठी खूपच उत्साहित आहेत. ते या सीरिजची आतुरतेने वाट बघत आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटाला चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, “रामायनाची गोष्ट आहे का व्हीएफएक्स?
प्रख्यात अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टी शोकसागरात