Friday, December 5, 2025
Home बॉलीवूड ‘अरब फॅशन वीक’मध्ये ‘इतका’ महागडा ड्रेस घालून पोहचली उर्वशी, गोल्डन गाऊनची किंमत ऐकून तुमचंही चक्रावेल डोकं!

‘अरब फॅशन वीक’मध्ये ‘इतका’ महागडा ड्रेस घालून पोहचली उर्वशी, गोल्डन गाऊनची किंमत ऐकून तुमचंही चक्रावेल डोकं!

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच तिच्या स्टाईलने मन जिंकण्यात यशस्वी ठरते. पण यावेळी तिने आपल्या स्टाईलने आपल्याला केवळ आश्चर्यचकित केले नाही, तर आपल्या नावावर एक यशही जोडले आहे. उर्वशी रौतेला ही अरब फॅशन वीकमध्ये दोनदा सहभागी होणारी पहिली भारतीय ठरली आहे. खास गोष्ट म्हणजे उर्वशी रौतेलाने अरब फॅशन वीकमध्ये ४० कोटी रुपयांचा सोन्याचा ड्रेस घातला होता. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. अशाप्रकारे उर्वशी रौतेलाने पुन्हा चाहत्यांची वाहवा मिळवली आहे.

यावेळी उर्वशी रौतेलाने हाय डीप कट स्ल्पिट गोल्डन एम्बेलिश्ड गाऊन परिधान केलेला पाहायला मिळाला. बलून स्लीव्हज आणि जास्त मेकअपसह जबरदस्त गोल्डन गाऊनमध्ये तिने चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकवला! या ड्रेसमध्ये ती एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नव्हती. तिचे हेडगियर अस्सल सोने आणि हिऱ्यापासून बनवले होते आणि हिरो. सर्वात प्रसिद्ध डिझानर्सपैकी एक, फर्न वन अमाटोने तिचा संपूर्ण ड्रेस डिझाइन केला होता. अमाटोने यापूर्वी बेयॉन्से आणि जेनिफर लोपेझसाठी कपडे डिझाइन केले आहेत. (urvashi rautela becomes first indian showstopper to walk for prestigious arab fashion week)

उर्वशी रौतेलाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची मिस युनिव्हर्स स्पर्धा २०२१ला जज करताना दिसली होती. याआधी उर्वशी रौतेला अरब सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत ‘वर्साचे बेबी’ या गाण्यात दिसली होती. अभिनेत्री लवकरच रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. इतकेच नाही, तर ती द्विभाषिक थ्रिलर ‘ब्लॅक रोझ’ तसेच ‘थिरुत्तू पायले २’च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.

हे देखील वाचा