Thursday, June 26, 2025
Home बॉलीवूड उर्वशी रौतेलाच्या नवीन व्हिडिओने वेधले अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष, सोबत दिसतोय ‘हा’ डान्सर

उर्वशी रौतेलाच्या नवीन व्हिडिओने वेधले अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष, सोबत दिसतोय ‘हा’ डान्सर

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या लूकमुळे आणि फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. तिने सोशल मीडियावर शेअर केलेला कोणताही फोटो किंवा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असतो. अशातच उर्वशीने शेअर केलेला नवीन व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा स्टनिंग लूक दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सुपरस्टार मोहम्मद रमादान तिच्यासोबत दिसत आहे.

उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, उर्वशी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती फोटोशूट करत आहे. यात तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या व्हिडिओमध्ये डान्सर आणि सिंगर मोहम्मद रमादान देखील दिसत आहे. तो देखील तिच्यासोबत फोटोशूट करत आहे. त्यानेही काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. (Urvashi Rautela did glamorous photoshoot with Mohammad Ramadan, video goes viral)

तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या फोटोवर तिचे चाहते ब्युटीफूल स्टनिंग अशा प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “तुझ्यात असणाऱ्या आत्मविश्वासामुळे तू मला खूप आवडते.”

उर्वशी लवकरच तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिला एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. ती ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ही स्टोरी सुपरकॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्रा यांच्या खऱ्या कहाणीवर आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये ती रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. तसेच ती उर्वशी रौतेलाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘ब्लॅक रोज’, ‘थ्रीतूत्तु पायले २’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा