बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेला ओळखली जाते. उर्वशीने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या बोल्ड लूकने तुफान लाईमलाइट मिळवत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील नेहमीच तिला चर्चेत आणतात. सोशल मीडियावर ती सतत तिचे हॉट, बोल्ड फोटोज, व्हिडिओ शेअर करत असते. कॅमेऱ्यासमोर अतिशय बिनधास्तपणे वावरणाऱ्या उर्वशीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. ती तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेली होती. या ट्रिपचे अतिबोल्ड फोटो तिने शेअर केले आहेत.

उर्वशी रौतेलाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती समुद्र किनारी बिकिनी टॉप घालून बोल्ड पोझ देताना दिसत आहे. याशिवाय तिने तिचे काही बिकिनी फोटो देखील शेअर केले आहे. सोसहल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींनपैकी एक म्हणून उर्वशी ओळखली जाते. ती सतत या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहत तिच्या कामाबद्दल माहिती देताना दिसते. आता तिने पोस्ट केलेल्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच हवा झाली आहे. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये उर्वशीने निळ्या रंगाची बिकिनी घातली असून, डोळ्यांवर गॉगल लावला आहे. यावर तिने गळ्यात काही ज्वेलरी देखील घातलेली दिसत आहे. या लूकमध्ये तिने किलर पोझ दिल्या आहेत.
हे फोटो शेअर करताना उर्वशीने कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा मी समुद्रातून बाहेर पडते तेव्हा माल माझा नवीन जन्म झाल्यासारखे वाटते.” उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, फॅन्सला देखील तिचे हे फोटो आवडत आहे. कमेंट्स करत ते तिच्या लूकचे भरभरून कौतुक करताना दिसत आहे. २५ फेब्रुवारी रोजी उर्वशीने तिचा २८ वा वाढदिवस साजरा केला होता.

उर्वशीने तिच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने अतिशय अमूल्य असे हिऱ्याचे दागिने घातले होते. या व्हिडिओमध्ये तिने हिऱ्याचा डबल लेयरचा नेकलेस, ब्रेसलेट डिझायनर कानातले आणि हातात मोठ्या अंगठ्या घातल्या होत्या. तिला सोशल मेडियावरूनही वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या. उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘ब्लॅक रोझ’ या थ्रिलर सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती रणदीप हुडासोबत ‘इंस्पेक्टर अविनाश’ मध्ये देखील झळकणार आहे.
हेही वाचा