Saturday, July 6, 2024

उर्वशी रौतेलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, दोन आंतराराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

 

आपल्या आयुष्यामध्ये आपण करत असलेल्या कामाचे कौतुक व्हावे, लोकांना ते आवडावे आणि आपल्याला आपल्या कामासंबधित पुरस्कार मिळावा असे प्रत्येकालाच वाटत असते. याला कलाकार देखील अपवाद नाही. अशात बॉलिवूडमधील अभिनेत्री उर्वशी रौतेलाला नुकतेच दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामुळे अध्या ती खूप आनंदी आहे.

उर्वशी रौतेला आपल्या अभिनयासह सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने सोनेरी रंगाचा एक वनपीस घातला आहे. या वनपीसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये तिला पुरस्कार मिळाल्याचे लिहिले आहे. उर्वशीला प्रभावशाली बॉलिवूड अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट मानवतावादी, अशा दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

तिने कोरोना काळात आणि पूर परिस्थितीमध्ये मुंबई आणि उत्तराखंडमधील अनेक गरजूंना मदत केली होती. त्यामुळेच तिला सर्वोत्कृष्ट मानवतावादी पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार अमृता फडणवीस यांनी उर्वशी रौतेला फाउंडेशन चॅरिटीला दिला. तिने हा पुरस्कार मोठ्या आनंदाने स्वीकारत सोशल मीडिया मार्फत सर्वांचे आभार देखील मागितले. हा आनंद व्यक्त करताना तिने लिहिले, “डबल सन्मानासाठी मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद मिड-डे. माझे काही दुर्मिळ आंतरराष्ट्रीय पुरस्कार.”

तिच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास नुकतीच ती मोहम्मद रमजानसोबत ‘वर्साचे बेबी’मध्ये झळकली होती. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. लवकरच ती एका तामिळ चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यामध्ये ती सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि आयआयटीयनची भूमिका साकारणार आहे. ‘ब्लॅक रोझ’ आणि ‘थिरुतु पायले २’ या दोन चित्रपटांच्या हिंदी रिमेकमध्ये देखील ती काम करणार असून, सोबतच ती रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सिरीजमध्येही दिसणार आहे.

नुकतीच ती गुरू रंधावासोबत ‘डब गे’ मध्ये देखील झळकली होती. तिच्या या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. उर्वशी कायमच तिच्या अभिनयासह हटके आणि बोल्ड लुकमुळे चर्चेत असते.

 

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा