Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

हिंदी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहे, ज्यांनी जरी चित्रपटांमध्ये जास्त काम केले नसले, तरीही त्यांची फॅन फॉलोविंग, लोकप्रियता एका मोठ्या अभिनेत्रीला देखील जोरदार टक्कर देऊ शकते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला. उर्वशीने खूप कमी कळत तिच्या लूक्सने, तिच्या आकर्षक नृत्याने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख आणि जागा निर्माण केली. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी उर्वशी एक आहे. उर्वशी नेहमीच सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते.

नुकताच उर्वशीने तिचा एक फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा फोटो आणि ही पोस्ट पाहून उर्वशीच्या चाहत्यांमध्ये नक्कीच आनंदाची लाट येणार आहे. उर्वशीसाठी तिच्या आयुष्यातील अतिशय अभिमानाचा आणि गौरवास्पद क्षण नुकताच येऊन गेला आहे. तिने हाच आनंद सर्वांसोबत शेअर केला आहे.

उर्वशीला नुकताच महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल असलेल्या श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ प्रदान करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/CQp9eWtBWB9/?utm_source=ig_web_copy_link

याबद्दल महिती देताना उर्वशीने लिहिले, “महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून मला ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ ने सन्मानित करण्यात आले आहे.” सोबतच तिने याच सोहळ्याचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यात तिचे नाव जाहीर केले जात आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने लिहिले, “हिंदी सिनेसृष्टीतील हा सन्मान मिळवणारी सर्वात कमी वयाची मी पहिलीच महिला आहे. मी सिनेसृष्टीतली सर्वात कमी वयाची हा पुरस्कार मिळवणारी पहिला असल्याचा मला खूप अभिमान आहे. हा पुरस्कार खरंच एक मोठा गौरव आहे.”

उर्वशीच्या या सन्मानावर फॅन्ससोबतच कलाकार देखील तिला शुभेच्छा देत आहे. उर्वशीसोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक महिलांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिशा वकानीचा सख्खा भाऊ आहे मयूर वकानी; ‘या’ कारणामुळे तिच्याप्रमाणेच तो देखील आहे शोमधून गायब

-‘फुलपाखरू’ फेम ऋता दुर्गुळेच्या ग्लॅमरस अदांनी चाहते घायाळ; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-न्यायालयाकडून ‘पंगा क्वीन’ कंगनाला जोरदार झटका; पासपोर्ट प्राधिकरणावर सोडला पासपोर्ट नूतनीकरणाचा निर्णय

हे देखील वाचा