Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड जणू भासे जलपरी! पन्नास लाखांच्या निळ्या रंगाच्या गाऊनमधे उर्वशीच्या घायाळ करणाऱ्या अदा

जणू भासे जलपरी! पन्नास लाखांच्या निळ्या रंगाच्या गाऊनमधे उर्वशीच्या घायाळ करणाऱ्या अदा

उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चित्रपटांमध्ये कमी झळकणारी उर्वशी तिच्या फोटोशूटमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत असते. उर्वशीचे नवनवीन फोटो नेहमीच इंटरनेटच्या जगात गाजताना दिसतात. बॉलिवूडमधील सुंदर आणि सर्वात स्टायलिस्ट अभिनेत्री म्हणूनही तिची ओळख आहे. ती नेहमीच तिचे वेगवेगळ्या लूक्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्वशी नेहमीच तिच्या लुक्स आणि ड्रेसिंगवर विविध प्रयोग करते.

नुकतेच उर्वशीचे काही क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. उर्वशीचे काही दिवसांपूर्वीच मोहम्मद रमजानसोबतचे ‘वर्साचे बेबी’ हे आंतरराष्ट्रीय गाणे प्रदर्शित झाले आहे. उर्वशीला आंतरराष्ट्रीय आयकॉनचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला आहे. तिच्या मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे तिला हा पुरस्कार मिळाला असून, या पुरस्कार वितरण समारंभात सहभाग घेतला होता. यावेळी तिचा लूक खूपच चर्चेत आला असून, त्याचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत.

उर्वशीला हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिने तिच्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशीने घातलेल्या ड्रेसमुळे प्रकाशझोतात आली आहे. या व्हिडिओमध्ये तिने घातलेल्या ड्रेसमुळे सर्वांच्या नजर तिच्यावर खिळल्या असून, तिला त्यावर प्रेक्षकांच्या विविध कमेंट्स येत आहेत. या व्हिडिओमध्ये तिने निळ्या रंगाचा हेव्ही एम्बेलिश्ड डिजाइनर सिल्वर हाई स्लिट कट ड्रेस घातला असून, त्यावर तिने हाई पोनी घातली आहे. या ड्रेसमध्ये जणू ती जलपरी दिसत असल्याचा भास सर्वांनाच होत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करतांना उर्वशीने लिहिले, “धन्यवाद फिल्मफेयर इंटरनॅशनल आयकॉन ऑफ द इयर २०२१ अवॉर्ड.”

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तामिळ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात ती माइक्रोबायोलॉजिस्ट आणि एका आईआईटीयनची भूमिका साकारत आहे. यासोबतच ती ‘ब्लॅक रोज’ आणि ‘थिरुतु पायले 2’ च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिचे गुरु रंधावासोबतचे ‘डूब गये’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. ती रणदीप हुडासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभावी अभिनेत्री असणाऱ्या टिस्का चोप्राने अनेक शॉर्ट फिल्म्सचे लिखाण करत स्वतःला सिद्ध केले उत्तम लेखिका

-वयाच्या पंधराव्या वर्षी फिल्मफेयरने सन्मानित झालेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी एकविसाव्या वर्षी पळून जाऊन केले होते लग्न

-कोणी उडवला थरकाप, तर कोणी पाडली भुरळ; पाहा ‘या’ अभिनेत्रींचा लक्षवेधी ‘हॅलोविन लूक’

हे देखील वाचा