Friday, July 5, 2024

रिषभचा पत्ता कट! उर्वशी रौतेला झालीय ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात वेडी?

भारतीय क्रिकेट संघ आशिया कपमध्ये सध्या सपाटून मार खात आहे. यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा होत आहे. असं असलं तरी सध्या एक नाव याच आशिया कपमधून रोज समोर येत आहे. ते नाव अर्थात ‘सनम रे’ फेम उर्वशी रौतेला. उर्वशी आधी रिषभ पंतमुळे व आता पाकिस्तानी क्रिकेटरमुळे चर्चेत आली आहे.

रिषभ पंतबरोबर जोडले गेले नाव
जवळपास ११ हिंदी सिनेमात छोटे मोठे रोल केलेली उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सध्या भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी दुबईत गेली आहे. ती भारताच्या सर्वच सामन्यांना हजेरी लावताना दिसत आहे. अशातच माध्यमातील काही वृत्तांनुसार, तिच्यात व भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्यामध्ये काहीतरी सुरू असल्याचे वृत्त होते. यामुळे पुढे उर्वशी व रिषभमध्ये वादही (Urvashi And Rishabh Controversy) झाले होते. तसेच रिषभने अफेअरच्या सर्व वृत्तांचे खंडन केले होते. यानंतर आता उर्वशी एका इंस्टा स्टोरीमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

एकमेंकांकडे पाहून लाजले
पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शहा (Naseem Shah) आणि तिचा एक व्हिडीओ उर्वशीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात उर्वशी प्रेक्षकांमध्ये बसून सामन्याची मजा घेत आहे, तर नसीम फिल्ड दिसत आहे. यात जेव्हा कॅमेरा नसीम व उर्वशीवर जातो, तेव्हा दोघेही लाजताना दिसत आहे. अनेक चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यातील आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ स्वत: उर्वशीनेच शेअर केला होता. यातून तिला नक्की काय सांगायचं आहे हे मात्र स्पष्ट होत नाही.

दोघांच्या वयात ९ वर्षांचं अंतर
फक्त १९ वर्षे वय असलेला नसीम शहा पाकिस्तानकडून १९ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. तो पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज आहे, तर दुसरीकडे उर्वशीने ११ पेक्षा जास्त हिंदी सिनेमात काम केले असून ती नसीमपेक्षा ९ वर्षांनी मोठी आहे. रिषभनंतर पाकिस्तानच्या नसीम खानबरोबर नाव जोडलं गेल्यामुळे उर्वशी मात्र सध्या भलतीच चर्चेत दिसत आहे.

चाहत्यांनी केलं ट्रोल
दुसरीकडे आजपर्यंत अनेक भारतीय अभिनेत्री व पाकिस्तानी क्रिकेटर यांची नाव जोडली गेली आहेत. काहींनी पुढे जाऊन लग्नही केलं आहे. त्यामुळे उर्वशी-नसीमच्या या हास्यामागे अफेअरची चर्चाही जोर धरु लागली आहे. काही चाहत्यांनी मात्र उर्वशीला ट्रोल करणे पसंत केले आहे. तसेच पाकिस्तानी क्रिकेटरबरोबर नाव जोडलं गेल्यामुळे नाराजीही व्यक्त केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानमधून मात्र नसीम-उर्वशी जोडीला पसंत केले जात आहे.

दरम्यान भारतीय संघ आशिया कपमधून जवळपास बाहेर गेल्यात जमा आहे. संघाचे सलग दोन पराभवांमुळे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे उर्वशीलाही लवकरच भारतात परतावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. उर्वशीबद्दल बोलायचं झालं, तर तिला सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग लाभला आहे. तीला इंस्टाग्रामवर ५ कोटी ३० लाख चाहते फॉलो करतात. तीच्या रिल्स व फोटोंना चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स सतत येत असतात. असं म्हणतात की उर्वशीला भारताबरोबर बाहेरचेही चाहते लाभले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होण्यापूर्वी रणबीर आणि आलियाचा निषेध, महाकाल मंदिरात जाण्यापासून रोखले
‘लायगर’ फ्लाॅप झाल्याने विजय देवराकोंडा अडचणीत; ‘या’ चित्रपटाची रिलीज तारीख ढकलणार पुढे
‘ब्रम्हास्त्र’ने रिलीज होण्याआधीच तोडला ‘भुलभूलैया २’चा रेकॉर्ड, एडवांस बुकिंगने केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

हे देखील वाचा