आपल्या परफेक्ट फिगर आणि मनमोहक लूकसह, चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार धमाल करत आहे. तसे तर उर्वशी नेहमीच तिच्या सौंदर्याच्या जादूने चाहत्यांना वेड लावत असते. पण यावेळी तिचा अंदाज थोडा जास्त कातिलाना असल्याचे दिसत आहे. कारण उर्वशीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती डिपनेक आणि हाय थाई स्लिटसह, काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली आहे.
खरं तर, हा व्हिडिओ उर्वशी रौतेलाच्या मेक-अप रूममधील आहे. जिथे ती एका कार्यक्रमासाठी तयार झालेली दिसून येत आहे. या खास प्रसंगासाठी तिने खूप बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. ज्याचा डीप गळा आणि हाय स्लिट स्टाईल चाहत्यांना वेड लावत आहे.
अलीकडेच उर्वशी रौतेलाचे आंतरराष्ट्रीय गाणे ‘व्हर्सेक बेबी’चे अरबी व्हर्जन रिलीझ झाले आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये ती इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदानसोबत दिसली आहे. हे गाणे रिलीझ होताच यूट्यूबवर नंबर १ ट्रेंड होऊ लागले होते. आता याचे हिंदी व्हर्जनही लवकरच रिलीझ होणार आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर उर्वशी रौतेला अखेरच्या वेळीस ‘व्हर्जिन भानुप्रिया’ मध्ये दिसली होती. ती लवकरच ‘ब्लॅक रोज’ मध्येही दिसणार आहे, ज्याचे वर्णन थ्रिलर फिल्म म्हणून केले जात आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होईल.
याशिवाय नुकतेच समोर आलेल्या उर्वशी रौतेलाच्या तमिळ रिमेक चित्रपट ‘थिरुट्टू पायल २’ च्या फर्स्टने लूकने बऱ्याच चर्चा रंगवल्या होत्या. तसेच ती लवकरच जॉन अब्राहमसोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे. सध्या तर अभिनेत्री उर्वशी रौतेला रणदीप हुड्डासह ‘इंस्पेक्टर अविनाश’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. त्यांनी नुकतेच याचे शूटिंग पूर्ण केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अरे व्वा! अगस्त्यने टाकले पहिले पाऊल, हार्दिक आणि नताशाने केला व्हिडिओ शेअर