Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड उर्वशी रौतेलाच्या हवेत उडणाऱ्या केसांनी चाहत्यांना केले घायाळ; अदा पाहून नेटकरी म्हणाले, ‘उफ्फ!’

उर्वशी रौतेलाच्या हवेत उडणाऱ्या केसांनी चाहत्यांना केले घायाळ; अदा पाहून नेटकरी म्हणाले, ‘उफ्फ!’

बॉलिवूडची स्टायलिश अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत असते. चाहत्यांना उर्वशीच्या प्रत्येक कृतीने भुरळ घातली आहे. तिचे सोशल मीडिया अकाऊंट तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. नुकत्याच उर्वशीच्या एका व्हिडिओने तिच्या चाहत्यांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. काही तासांतच उर्वशीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

उर्वशीने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत उर्वशीने तपकिरी रंगाचा खोल गळा असलेला ड्रेस परिधान केला आहे. यात तिचे सोनेरी केस एका अप्सरेप्रमाणे दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये उर्वशीचे लांब आणि सरळ केसांनी तिच्या चाहत्यांना पुरते घायाळ केले आहे. व्हिडिओत मंद गतीने हवेत उडणारी केसांची झुळूक आणि तिच्या चेहऱ्यावरील मोहक हावभावही स्पष्टपणे दिसत आहेत.

उर्वशीच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये “जगातील सर्वात सुंदर महिला,” असे लिहिले आहे. त्याचवेळी आणखी एका चाहत्याने “उफ्फ क्या अदा है,” असे लिहिले आहे. उर्वशीच्या या व्हिडिओवर काही तासांत लाखो लाईक्सचा पाऊस पडला आहे.

उर्वशीला अलीकडेच यूएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली. उर्वशीने लिहिले की, “ती भारतातील पहिली महिला बनली आहे, जिला दुबईचा गोल्डन व्हिसा अवघ्या १२ तासात मिळवता आला आहे.”

वास्तविक, गोल्डन व्हिसा हा दहा वर्षांचा रहिवासी परवाना आहे. जे यूएई फक्त काही लोकांना देते. ही सेवा यूएईने २०१९ मध्ये सुरू केली होती. उर्वशीच्या आधी चित्रपटांमध्ये बराच काळ घालवलेल्या संजय दत्तला हा व्हिसा मिळाला.

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने साल २०१३ मध्ये ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हनी सिंग बरोबरच्या ‘लव डोस’ या गाण्यामधून तिला विशेष पसंती मिळली. लवकरच ‘ब्लॅक रोज’ या आगामी चित्रपटामधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरण आणि रिया चक्रवर्ती प्रकरण जोडणारा ‘हा’ आहे सारखाच दुवा

हे देखील वाचा